पुणे महापालिकेची आता खरी कसोटी लागणार; २३ गावांच्या समावेशानंतर 'हे' मोठे आव्हान राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 01:09 PM2020-12-28T13:09:45+5:302020-12-28T13:12:18+5:30

जिल्हा परिषदेकडून या २३ गावांमधील वास्तूंचा व मिळकतींचा ताबा घेणे हे महापालिकेसमोर मोठे आव्हान राहणार

Pune Municipal Corporation will now have a real test; This will be a big challenge | पुणे महापालिकेची आता खरी कसोटी लागणार; २३ गावांच्या समावेशानंतर 'हे' मोठे आव्हान राहणार

पुणे महापालिकेची आता खरी कसोटी लागणार; २३ गावांच्या समावेशानंतर 'हे' मोठे आव्हान राहणार

Next

पुणे : कररूपी पैशातून आम्ही शाळा, पाण्याच्या टाक्या, आरोग्य केंद्रांची उभारणी केली असल्याने, प्रथम त्याचे पैसे अदा करा व नंतर ताबा घ्या. अशी गळ घालणाऱ्या जिल्हा परिषदेकडून या २३ गावांमधील वास्तूंचा व मिळकतींचा ताबा घेणे हे महापालिकेसमोर मोठे आव्हान राहणार आहे. 

पुणे महापालिका हद्दीत २०१७ मध्ये समाविष्ट झालेल्या ११ गावांमधील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे व अन्य जिल्हा परिषदेच्या इमारतीच अद्याप महापालिकेच्या ताब्यात आलेल्या नाहीत. या ११ गावांमध्ये अशा ३६७ वास्तू असून, यापैकी २५६ वास्तू आजपर्यंत महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. उर्वरित १०१ वास्तू (मालमत्ता) ताब्यात घेण्यासाठी सध्या कसरत चालू आहे. या ११ गावांपैकी एका ठिकाणी ५० वर्षापूर्वी बांधलेल्या शाळेचा ताबा देण्यासाठी महापालिकेकडे ६५ लाख रूपये जिल्हा परिषदेने मागितले आहेत. मुळात ही शाळा मोडकळीस आली असताना अशी अवास्तव मागणी होत आहे.  

दरम्यान, महापालिकेच्या ताब्यात न आलेल्या मालमत्ता व वास्तूंचे आता जिल्हा परिषद व महापालिका यांच्याव्दारे संयुक्त मुल्यांकन करून ती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. फेब्रुवारी,२०२० मध्ये या समितीची स्थापना करण्यात आली होती. मात्र कोरोना आपत्तीमुळे हे काम थांबले होते़ २३ गावांच्या समावेशाच्या पार्श्वभूमीवर हे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दिली. 
    ----------------------
पुणे महापालिकेच्या ताब्यात जोपर्यंत सध्या कार्यरत असलेल्या वास्तू येत नाहीत तोपर्यंत तेथे महापालिकेची यंत्रणा उभारता येत नाही. यामध्ये सर्वाधिक वास्तू या शाळांच्या आहेत़ तर त्यापाठोपाठ प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, पाण्याच्या टाक्या, समाजमंदिरे, ग्रामपंचायत कार्यालय आदींचा समावेश होतो. या व्यतिरिक्त असलेल्या मोकळ्या जागा, मैदाने, तळी, स्मशानभूमी आदी मालमत्ता गावे महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यावर लागलीच हस्तांतरित होतात. यामुळे आता पहिल्या ११ गावांमधील व नव्याने येणाऱ्या २३ गावांमधील मालमत्ता ताब्यात घेणे हे महापालिकेसमोर मोठे आव्हान आहे. 
---------------
शाळा, आरोग्य केंद्राच्या इमारती घेणे आव्हान.. 
पुणे महापालिकेच्या ताब्यात जोपर्यंत सध्या कार्यरत असलेल्या वास्तू येत नाहीत तोपर्यंत तेथे महापालिकेची यंत्रणा उभारता येत नाही़. यामध्ये सर्वाधिक वास्तू या शाळांच्या आहेत. तर त्यापाठोपाठ प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, पाण्याच्या टाक्या, समाजमंदिरे, ग्रामपंचायत कार्यालय आदींचा समावेश होतो. या व्यतिरिक्त असलेल्या मोकळ्या जागा, मैदाने, तळी, स्मशानभूमी आदी मालमत्ता गावे महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यावर लागलीच हस्तांतरित होतात. यामुळे आता पहिल्या ११ गावांमधील व नव्याने येणाऱ्या २३ गावांमधील मालमत्ता ताब्यात घेणे हे महापालिकेसमोर मोठे आव्हान आहे. 
---------------

Web Title: Pune Municipal Corporation will now have a real test; This will be a big challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.