शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेने पाठवले पत्र; सह्याद्री हॉस्पिटलकडे मागितली मणिपालसोबतच्या करारनाम्याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 21:02 IST

सह्याद्री हॉस्पिटल यांच्याकडून मणिपाल हॉस्पिटल्स ग्रुप या संस्थेसमवेत करारनामा केल्याची प्रत घेतली असल्यास त्याबाबतचे वर्षिक भाडे रक्कमेच्या पावत्या सात दिवसाच्या आत पालिकेकडे सादर कराव्यात

पुणे : मणिपाल हॉस्पिटल्सने कॅनडातील ओंटारिओ टीचर्स पेंशन प्लॅनकडून सह्याद्री हॉस्पिटल्स समूहाचे अधिग्रहण केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. पुणे महापालिकेने सह्याद्री हॉस्पिटलची जागा कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट यांना प्रतिवर्षीचे १ रूपये भाडे या अटीवर ९९ वर्ष कालावधीसाठी भाडेपट्ट्याने दिलेली आहे. कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट यांचेकडून सह्याद्री हॉस्पिटल आणि सह्याद्री हॉस्पिटल यांच्याकडून मणिपाल हॉस्पिटल्स ग्रुप या संस्थेसमवेत करारनामा केल्याची प्रत आणि पालिका आयुक्ताची परवानी घेतली असल्यास त्याबाबतची प्रत सात दिवसाच्या आत पालिकेकडे सादर करावी असे पत्र पुणे महापालिकेेने कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट, सह्याद्री हॉस्पिटल इमारत यांना पाठिवले आहे.

एरंडवणा, फायनल प्लॉट नं.३० येथील १ हजार ९७६ चौरस मीटर जागा कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टला प्रीमीयम ५३ लाख ३५ हजार २०० रूपये आणि प्रति वर्षीचे १ रूपये भाडे देण्याच्या अटीवर ९९ वर्ष कालावधीसाठी भाडेपट्ट्याने दिलेली आहे. या जागेचा भाडे करारनामा पुणे महापालिका व कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट यांच्यामध्ये २७ फेबुवारी १९९८ रोजी झाला आहे. हा करारनामा कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट यांचेवर बंधनकारक आहे. कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट यांचेकडून सहयाद्री हॉस्पिटल यांचे समवेत सामंजस्य करार ३० सप्टेंबर २००६ रोजी झाला आहे. सध्या सहयाद्री हॉस्पिटल यांनी परस्पर मणिपाल हॉस्पिटल्स ग्रुप यांना हस्तांतरित केले आहे. मात्र पुणे महापालिका आणि कोकण मित्र मंडळ यांच्या समवेत करण्यात आलेल्या करारनाम्यातील अटीमध्ये भाडेकराराने भाड्याने दिलेली जागा अगर तिचा कोणताही भाग, अथवा या जागेवर बांधण्यात येणाऱ्या इमारतीचा कोणताही भाग हा लिहून देणार यांना अन्य कोणाही संस्थेस भाड्याने, पोटभाड्याने, अथवा अन्य कोणत्याही प्रकारे व कोणत्याही कारणास्तव देता येणार नाही. मात्र हॉस्पिटल योग्य रीतीने चालविण्याचे उद्देशाने सेवा-सुविधा उपलब्ध करण्यासाठी योग्य संस्था, कंपनी यांचे बरोबर करारनामा करण्यास सवलत राहील, असे नमूद आहे. भाडे कराराने देण्यात आलेली जागा त्यांनी इतर कोणालाही गहाण, दान, बक्षीस यासह . कोणत्याही जडजोखमीत गुंतवता कामा नये, या जागेबावत अन्य कसल्याही प्रकारचे हक्क निर्माण करण्याचा अधिकार लिहून देणार यांना राहणार नाही असे नमुद केले आहेकोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट यांच्याकडून सह्याद्री हॉस्पिटल आणि सह्याद्री हॉस्पिटल यांच्याकडून मणिपाल हॉस्पिटल्स ग्रुप या संस्थेसमवेत करारनामा केल्याची प्रत आणि पालिका आयुक्ताची परवानी घेतली असल्यास त्याबाबतची प्रत ,प्रमियम आणि वर्षिक भाडे रक्कमेच्या पावत्या सात दिवसाच्या आत पालिकेकडे सादर करावी असे पत्र पुणे महापालिकेेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त वसुंधरा बारवे यांनी पाठविले आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलGovernmentसरकारMONEYपैसाSocialसामाजिकdoctorडॉक्टर