शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिका : पंचवार्षिक कालावधी उरला फक्त ४८ तास; उद्घाटनांची लगीनघाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 14:22 IST

उद्घाटन, भूमिपूजन नामकरण सोहळ्याच्या कार्यक्रमांची शहरात लगीनघाई...

पुणे : महापालिकेच्या सभागृहाची पंचवार्षिक कालावधी येत्या १४ मार्च रोजी संपत असल्याने हातात असलेल्या दोन दिवसांमध्ये आप आपल्या प्रभागांमधील उद्घाटन, भूमिपूजन नामकरण सोहळ्याच्या कार्यक्रमांची शहरात लगीनघाई सुरू आहे.

महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयाकडून शनिवार (दि. ११) व रविवारी होणाऱ्या ३० कार्यक्रमांची पत्रिका छापणे व ती सर्व मान्यवरांपर्यंत पोहोचविण्याकरिता शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत धावपळ सुरू होती. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर महापालिकेच्या माध्यमातून उभारलेल्या वास्तूंचे उद्घाटन सोहळे घेता येत असल्याने गुरुवारी (दि.१०) झालेल्या सर्वसाधारण सभेत हे सर्व विषय मंजूर करण्यात आले. यामध्ये स्थानिक नेत्यांच्या व समाजातील अन्य मान्यवरांच्या हस्ते विविध प्रभागांमधील होणारे सोहळे वेगळे असले तरी महापालिकेच्या माध्यमातून ३० कार्यक्रम होत आहेत.

यातील १० कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित राहणार असून ४ कार्यक्रमांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis), दोन कार्यक्रमांना त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadnavis) उपस्थित राहणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्याहस्ते ९ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम होणार आहे.

महापालिकेचा कर्वे रस्त्यावरील दुहेरी उड्डाणपूल हा यातील महत्त्वाचा कार्यक्रम ठरणार आहे. रविवारी होणाऱ्या या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. इतर कार्यक्रमांमध्ये मैदान, व्यायामशाळा, क्रीडा संकुल, लोकार्पण सोहळे होणार आहेत शनिवारी महापालिकेचे यात तीन कार्यक्रम असून उर्वरित २७ कार्यक्रम रविवारी होतील.

महापालिकेची औपचारिक किंबहुना गेल्या पाच वर्षातील कामकाजावरील आपले अनुभव व्यक्त करणारी सर्वसाधारण सभा सोमवार १४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्री १२ वाजता विद्यमान महापालिका सभागृहाची मुदत संपुष्टात येत असल्याने रविवारपर्यंतच / सर्व मान्यवरांकडून विविध कार्यक्रम करून घेतले जात आहेत. बुधवारी सकाळपासून महापालिकेचा कारभार इतिहासात दुसऱ्यांदा तेही तब्बल सन १९५८ नंतर प्रशासनाच्या ताब्यात जाणार आहे.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmruta Fadnavisअमृता फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटील