शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

पुणे महापालिकेत स्वच्छतागृहामध्ये अधिकाऱ्यांची भरली  ‘शाळा’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 9:56 PM

स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी आलेले अपयश पुसण्यासाठी आणि यावर्षी अव्वल क्रमांक प्राप्त करण्यासाठी महापालिका हरेक तऱ्हेचे प्रयत्न करीत आहे.

पुणे : स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी आलेले अपयश पुसण्यासाठी आणि यावर्षी अव्वल क्रमांक प्राप्त करण्यासाठी महापालिका हरेक तऱ्हेचे प्रयत्न करीत आहे. प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांना कामाला लावले जात आहे. सर्वेक्षणामध्ये महत्वाचा घटक असलेल्या स्वच्छता गृहांच्या स्वच्छतेबाबत अतिरीक्त आयुक्त शांतनू गोयक यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांची बुधवारी थेट स्वारगेट येथील स्वच्छतागृहातच ‘शाळा’ घेतली. सर्व परिमंडल उपायुक्त, क्षेत्रीय अधिकाऱ्यांना स्वच्छता गृहातच स्वच्छतेचे निकष पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाची पालिकेमध्ये मात्र खुमासदार चर्चा रंगली होती.     केंद्र शासनाकडून दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण घेण्यात येते. या वर्षीच्या स्पर्धेसाठी पालिकेला हगणदरीमुक्त (ओडीएफ प्लस अथवा ओडीएफ प्लस प्लस) हा दर्जा असणे आवश्यक आहे. सर्वेक्षणाच्या तपासणीमध्ये पालिका अपात्र ठरली. सर्वेक्षणाचे अवघे दोन महिने शिल्लक राहिलेले असल्याने पालिकेने केंद्र शासनाकडे पुन्हा ओडीएफ प्लस दर्जा मिळविण्याकरिता अर्ज दाखल केला आहे. पात्र ठरण्याकरिता आता शहरातील साडेबाराशे स्वच्छतागृहांना  ‘बेस्ट टॉयलेट’ बनविण्याकरिता प्रयत्न करण्यात येणार आहेत. यातील 23 टक्के (310) स्वच्छतागृहे ‘बेस्ट’ असणे आवश्यक आहे.या स्वच्छता गृहांमध्ये नागरिकांना द्यावयाच्या सुविधांची यादी लांबलचक असून जवळपास 53 सुविधा पुरवाव्या लागणार आहेत. ज्यावेळी सर्वेक्षणाचे तपासणी पथक पुन्हा येईल तेव्हा क्षेत्रीय कार्यालयांकडून स्वच्छता गृहांची पूर्ण स्वच्छता आणि निकष पूर्ण केलेले असावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत. ही स्वच्छतागृहे कशी असावीत, नेमक्या काय उपाययोजना केल्या जाव्यात याचे प्रशिक्षण देण्यासाठी अधिकाऱ्यांना स्वारगेट येथील पालिकेच्या ‘बेस्ट टॉयलेट’जवळ बोलाविण्यात आले होते. या स्वच्छतागृहातच अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. स्वच्छतागृहातच सर्वांना निकषांबाबतची आणि सुविधांबाबतची माहिती दिली. अधिकाऱ्यांच्या शंकांच्या निरसनही यावेळी गोयल यांनी केले. सहायक आयुक्तांना जबाबदार धरण्यात येणार   स्वच्छ सर्वेक्षणात टिकण्यासाठी पुन्हा ओडीएफ प्लस तपासणी आवश्यक आहे. या तपासणीसाठी सर्व स्वच्छतागृहे स्वच्छ आणि निकषांवर उतरणारी हवीत. त्याची जबाबदारी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांच्या सहायक आयुक्तांवर निश्चित करण्यात आली आहे. या कामात हलगर्जीपणा, दिरंगाई झाल्यास अगर पालिकेला ओडीएफ प्लस दर्जा न मिळाल्यास त्यासाठी संबंधित सहायक आयुक्तांना जबाबदार धरण्यात येणार आहे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानGovernmentसरकार