पुणे महानगरपालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 08:04 PM2021-03-17T20:04:48+5:302021-03-17T20:05:55+5:30

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आला होता

Pune Municipal Corporation Health Chief Dr. Ashish Bharti Corona positive | पुणे महानगरपालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती कोरोना पॉझिटिव्ह

पुणे महानगरपालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती कोरोना पॉझिटिव्ह

googlenewsNext

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. बुधवारी तर दुपारपर्यंतच जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाच हजारांच्यावर पोहचली आहे. त्यामुळे पुण्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभागप्रमुख डॉ. आशिष भारती यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभागप्रमुख म्हणून डॉ. आशिष भारती यांनी जबाबदारी स्वीकारली होती. तसेच त्यांनी पालिका आणि खासगी रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला होता.पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुखपदी डॉ. रामचंद्र हंकारे यांचा प्रतिनियुक्ती कालावधी संपल्यानंतर 30 सप्टेंबर 2020 रोजी पुढील एक वर्षांसाठी डॉ. आशिष भारती यांची नियुक्ती करण्यात आली होती. याअगोदर भारती यांनी आरोग्य सेवा ( कुटुंब कल्याण) सहाय्यक संचालक म्हणून सहा वर्षे कार्यरत होते.

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. कोरोनाच्या सुरूवातीपासुन सौरभ राव हे कोरोनाच्या संपुर्ण प्रक्रियेत कायम अग्रभागी राहिले होते. महापालिकेबरोबर वेगवेगळ्या भागांत प्रतिबंधित क्षेत्र करणे असो की कशा पद्धितीने नियमांची अंमलबजावणी करायची हे ठरवणे असो ते कायमच थेट या भागांना भेटी देत पाहणी करत नियोजन करत होते.

Web Title: Pune Municipal Corporation Health Chief Dr. Ashish Bharti Corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.