शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मुठा कालवा दुर्घटनाग्रस्तांच्या निवाऱ्याचा पालिकेला विसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 21:17 IST

मुठा कालवा बाधितांसाठी राहण्याची साेय राष्ट्र सेवा दलाच्या रावसाहेब पटवर्धन शाळेतर्फे करण्यात तातडीने करण्यात अाली. परंतु तीन दिवसानंतरही पालिकेचे कुठलेही पदाधिकारी या शाळेतील बाधितांना भेटण्यासाठी किंवा त्यांच्या राहण्याची साेय करुन देण्यासाठी अाले नसल्याचे चित्र अाहे.

पुणे : मुठा कालवा दुर्घटनेमध्ये बाधीत झालेल्यांना तातडीने निवासाची साेय राष्ट्रीय सेवा दलाच्या रावसाहेब पटवर्धन शाळेकडून करण्यात अाली. बाधीतांना तातडीने निवाऱ्याची साेय करणे अावश्यक असल्याने शाळेने अापली जागा त्यांना उपलब्ध करुन दिली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेचे अाभार देखील मानले परंतु गेल्या तीन दिवसांपासून या शाळेत रहिवासासाठी असलेल्या बाधितांना भेटण्यासाठी किंवा त्यांची व्यवस्था इतरत्र करण्यासाठी महापाैर तसेच पालिकेच्या पदाधिकाऱ्यांपैकी काेणीही अाले नाही. शाळेत काही अाधीच ठरलेले कार्यक्रम उद्या हाेणार असल्याने शाळेचा हाॅल रिकामा करुन द्यावा लागणार अाहे. त्यामुळे अाता करायचे काय असा प्रश्न शाळा प्रशासनापुढे निर्माण झाला अाहे. 

    राष्ट्र सेवा दलाच्या रावसाहेब पटवर्धन शाळेत मुठा कालव्याच्या अपघातातील पीडीतांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. यात महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक व लहान मुले यांचा समावेश आहे. शाळेतील एक मोठे सभागृह व दोन वर्गात पीडीतांना तात्पुरत्या स्वरुपात राहण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. गुरुवारी घटना घडल्यानंतर त्यापुढील दोन दिवस शाळेतच त्यांना निवारा व जेवण देण्यात आले. रविवारी पटवर्धन शाळेच्या नाथ पै सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याने त्या सभागृहातील पीडीतांची व्यवस्था पालिकेच्या अन्य शाळेत करण्यात यावी. असे संस्थेच्या पदाधिकारी वर्षा गुप्ते यांनी म्हटले आहे. वास्तविकतः पालिकेने बाधितांची व्यवस्था महानगरपालिकेच्या शाळेत किंवा इतरत्र करणे अावश्यक अाहे. परंतु ज्या शाळेने या पिडीतांना मदत केली, त्याच शाळेवर त्यांची जबाबदारी पालिका प्रशासनाने टाकली असल्याचे चित्र अाहे.     दरम्यान संस्थेच्या पदाधिका-यांनी व स्वयंसेवकांनी पीडीतांकरिता पुढाकार घेवून त्यांना आवश्यक मदत केली असून त्यांच्या जेवणाचा व निवासाचा प्रश्न तात्पुरत्या स्वरुपात सोडवला आहे. शहरातील विविध सेवाभावी संस्थांकडून जेवण उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  सकाळी सहा-सातच्या सुमारास शाळेबाहेर पडून रात्री नऊनंतर विश्रांतीकरिता पुन्हा शाळेत पीडीत कुटूंबीय येतात. या शाळेत साधारणपणे दीडशे ते दोनशे पीडीतांच्या निवा-याची सोय करण्यात आली आहे. 

     विशेषत: लहान बालकांची काळजी घेण्यात आली आहे. कालवा दुर्घटनेत पूर्ण संसार गमावल्यानंतर हाताशी काही शिल्लक नसलेल्या त्या पीडीतांच्या लहान मुलांकरिता  काही शिक्षकांनी वस्तुरुपाने मदत केली आहे. लहान बाळांची कपडे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शाळेच्या वेळापत्रकात देखील बदल करण्यात आला असून शनिवारी महिना अखेर असल्याने शाळेला दुपारीच सुटी जाहीर करण्यात आल्याचे गुप्ते यांनी सांगितले. शहराच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात नागरिक व काही संस्था कपडे पाठवित आहेत. पीडीतांकरिता कपडे आरोग्यसेनेच्यावतीने शुक्रवारी व शनिवारी दांडेकर पुल याठिकाणी आरोग्य शिबिर घेण्यात आले. 

टॅग्स :Puneपुणेmula muthaमुळा मुठाAccidentअपघातPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका