शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार; ४२ प्रभागांत असतील १६५ नगरसेवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:38 IST

- २०११च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार प्रभाग रचना करण्याचे राज्यसरकारचे आदेश; पुणे महापालिकेची निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवीत, प्रत्येक प्रभागात ४ सदस्य, ४२ प्रभागांसाठी १६५ नगरसेवक

पुणे :पुणे महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे. २०११च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार प्रभाग रचना करावी, असे आदेश राज्यसरकारच्या नगरविकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे पुण्यात प्रभाग संख्या ४२ राहणार असून, नगरसेवकांची संख्या १६५ राहणार आहे.

पुणे महापालिकेची मुदत १४ फेब्रुवारी २०२२ रोजी संपली. त्याअगोदर पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना एक, दोन आणि तीनची होणार यावर सातत्याने चर्चा झाली. अखेर महाविकास आघाडी सरकारने या निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग करण्याचा निर्णय घेतला. त्यावर आरक्षण सोडत घेऊन प्रभाग रचनाही जाहीर केली. या रचनेवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात होत्या.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेची निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला असून इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या. त्यातच राज्यसरकारच्या नगरविकास विभागाने महापालिकासाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले आहे. मुंबई महापालिका वगळता उर्वरित महापालिकाची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे. त्यानुसार पुणे महापालिकेची आगामी निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे. २०११च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार प्रभाग रचना करण्याचा समावेश आहे. पुणे महापालिकेत समाविष्ट ३२ गावांची २०११ सालची जनगणना ३४ लाख ८१ हजार ९०० होती. त्यानुसार प्रभागाची संख्या ४२ राहणार असून, नगरसेवकांची संख्या १६५ राहणार आहे.

प्रभाग रचनेची अशी होणार प्रक्रिया

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करून राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पालिका आयुक्तांनी सादर करावी. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यावर असणार आहे. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचना आयुक्तांनी प्रसिद्ध करावी. त्या प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त हरकती व सूचनावर राज्यसरकारने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यामार्फत सुनावणी घेण्यात येणार आहे. या हरकती सुनावणीनंतर अंतिम केलेल्या प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर कराव्या लागणार आहेत. त्यानंतर राज्य निवडणूक आयोग प्रभाग रचनेला मान्यता देणार आहे. त्यानंतर पालिका आयुक्त अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करावी असे राज्यसरकारने आदेशात नमूद केले आहे.

प्रभाग रचनेची मार्गदर्शक तत्त्वे

प्रभाग रचना सुरू करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात करावी. उत्तरेकडून ईशान्य (उत्तर-पूर्व) त्यानंतर पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करत सरकावे. शेवट दक्षिणेत करावा. प्रभागांना क्रमांकही त्याच पद्धतीने द्यावेत. प्रभाग रचना करताना भाैगोलिक सलगता राहील, याची काळजी घ्यावी. प्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, फ्लायओव्हर इत्यादी नैसर्गिक मर्यादा विचारात घेउन निश्चित करावी. कोणत्याही परिस्थितीत एका इमारतीचे, चाळीचे, घराचे नवविभाजन दोन प्रभागांमध्ये होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मोकळ्या जागांसह सर्व जागा कोणत्या ना कोणत्या प्रभागात आल्याच पाहिजे. प्रभाग रचनेच्या बाबतीत कोणासही शंका घेण्यास वाव राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. सीमेचे वर्णन करताना रस्ते, नाले, नद्या, सिटी सर्व्हे नंबर यांचे उल्लेख प्रामुख्याने यावयास हवे. प्रभागातील वस्त्यांचे शक्यतो नवविभाजन होणार नाही याची दक्षता घ्यावी.

आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती

प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाणार आहे. त्यात स्थानिक स्वराज संस्थेच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अनधकारी, नगर रचनाकार, संगणक तज्ज्ञ आवश्यकतेनुसार इतर अधिकारी यांचा समावेश करावा, असे आदेशात नमूद केले आहे.

जनगणना न झालेल्याचा असाही फटका

कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे देशाची जनगणना झाली नाही. त्यामुळे २०११ ची लोकसंख्या गृहीत धरली जाणार आहे. त्याचा फटका नगरसेवकांच्या संख्यावाढीला बसणार आहे. पुण्याची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ३४ लाख ८१ हजार आहे. पण, मतदारांची नोंदणी सुरू आहे. त्यामुळे लोकसंख्या ३४ लाख आणि मतदारसंख्या ३२ लाख आहे. कदाचित मतदारांची संख्या अधिक वाढू शकणार आहे.

 पुण्याची एकूण लोकसंख्या३४,८१,९००अनुसूचित जाती (एसी)४,८०,०१७अनुसूचित जमाती (एसटी)४१,५६१

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक 2024