शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

पुणे-मुंबई रेल्वे बारा दिवसांनी ‘रुळावर’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 12:49 PM

मंकी हिलजवळ रेल्वेमार्गावर ३ ऑगस्ट रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळली. त्यानंतर यामार्गे जाणाऱ्या सर्व इंटरसिटी एक्सप्रेससह लांबपल्याच्या अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या होत्या.

ठळक मुद्देदरडीमुळे रेल्वेमार्गाचे मोठे नुकसान : रेल्वे यंत्रणा मार्ग दुरूस्त करण्यासाठी दिवसरात्र कार्यरत

पुणे : दरड कोसळल्याने मागील १२ दिवसांपासून बंद असलेली पुणे-मुंबईदरम्यानचीरेल्वे वाहतुक शुक्रवार (दि. १६)पासून ‘रुळावर’ आली. दोन्ही शहरांदरम्यान डेक्कन क्वीन, इंद्रायणी, सिंहगड  व इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्या धावल्या. शनिवार (दि. १७)पासून सर्व गाड्या नियमित वेळेनुसार धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पुणे व मुंबईदरम्यानची रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली होती. घाटामध्ये दरड कोसळण्याचे प्रकार घडत होते. तसेच मुंबई विभागात अनेकदा रेल्वेमार्ग पाण्याखाली गेले. त्यामुळे गाड्या रद्द करण्याबरोबरच अनेक गाड्या विलंबाने धावत होत्या. दि. ३ ऑगस्ट रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मंकी हिलजवळ रेल्वेमार्गावर मोठी दरड कोसळली. त्यानंतर या मार्गावर रेल्वे वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली होती. दि. ४ ऑगस्टपासून यामार्गे जाणाऱ्या सर्व इंटरसिटी एक्सप्रेससह लांबपल्याच्या अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या होत्या. तर काही गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या. काही गाड्यांना पुणे, दौंड किंवा सोलापुरमधूनच वळविण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.दरडीमुळे रेल्वेमार्गाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे संपुर्ण रेल्वे यंत्रणा हा मार्ग दुरूस्त करण्यासाठी युध्दपातळीवर दिवसरात्र कार्यरत होता. हा मार्ग नेमका कधी सुरू होणार याबाबत रेल्वे प्रशासनाकडूनही स्पष्टपणे माहिती दिली जात नव्हती. त्यामुळे सातत्याने रेल्वे गाड्या रद्द करणे, पुन्हा पुर्ववत करणे, मार्ग बदलले जात होते. अखेर मध्य रेल्वेने शुक्रवारपासून मार्ग सुरू करण्याची घोषणा स्वातंत्र्यदिनी केली. त्यानुसार शुक्रवारी मुंबईतून पुण्याकडे डेक्कन क्वीन रवाना करण्यात आली. तर पुण्यातून इंटरसिटी व इंद्रायणी एक्सप्रेस या गाड्या मुंंबईकडे धावल्या. सिंहगड एक्सप्रेसने दोन्ही शहरादरम्यान एक फेरी पुर्ण केली. शनिवारपासून सर्व इंटरसिटी एक्सप्रेसबरोबरच इतर लांबपल्ल्याच्या गाड्याही नियमित वेळापत्रकानुसार धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. तत्पुर्वी या गाड्या दि. १९ आॅगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या होत्या. दोन्ही शहरांदरम्यान रेल्वेसेवा सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या काळात रेल्वे प्रवाशांना एसटी बसचा मोठा आधार मिळाला. तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडूनही विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईrailwayरेल्वेpassengerप्रवासी