शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

PUNE MIDC FIRE : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दु:ख; मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 21:34 IST

Pune Fire : सॅनिटाझर तयार करणाऱ्या कंपनीला लागली होती आग. अनेकांचा आगीत होरपळून झाला होता मृत्यू.

ठळक मुद्देसॅनिटाझर तयार करणाऱ्या कंपनीला लागली होती आग.अनेकांचा आगीत होरपळून झाला होता मृत्यू.

पौड रस्त्यावरील घोटवडे फाट्याजवळील उरवडे रोड येथे एका सॅनिटायझर बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग लागून काही कर्मचाऱ्यांना यात होरपळून मृत्यू झाला. यामध्ये प्रामुख्याने महिला कामगारांचा समावेश आहे. सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना मदत करण्याची घोषणा केली आहे.

पंतप्रधान कार्यालयानं ट्विटरद्वारे यासंदर्भातील माहिती दिली. "महाराष्ट्रात पुण्यातील एका कारखान्यात लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकास 'पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून' २ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. जखमी व्यक्तींना ५० हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे," असं पंतप्रधान कार्यालयानं सांगितलं आहे.

राज्याकडूनही मदत“पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल,” अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेMIDCएमआयडीसीfireआगNarendra Modiनरेंद्र मोदीAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्र