शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पुणे म्हाडाच्या 5 हजार 647 घरांची बंपर सोडत जाहीर; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई शुभारंभ होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 16:09 IST

Mhada Lottery 2020 म्हाडा अंतर्गत सदनिकांसाठी अर्जाची ऑनलाईन नोंदणी आज ( दि. १०) सायंकाळी 5 वाजता सुरु होईल.

ठळक मुद्देhttps://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी

पुणे : कोरोनानंतर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) च्या पुणे विभागातील तब्बल 5 हजार 647 घरांची ऑनलाईन पध्दतीने जानेवारीमध्ये बंपर सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी अर्ज नोंदणीचा शुभारंभ गुरूवार (दि.10) रोजी दुपारी 2.30 वाजता उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबईत करण्यात येणार आहे. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,  गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील,गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही. आर श्रीनिवासन,म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर उपस्थित राहणार असल्याची माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली.

म्हाडा अंतर्गत सदनिकांसाठी अर्जाची ऑनलाईन नोंदणी उद्या सायंकाळी 5 वाजता सुरु होईल. याअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतून पुणे जिल्हयात म्हाळूंगे (चाकण) येथे 514, तळेगांव दाभाडे येथे 296, सोलापूर जिल्हयात गट नं. 238/1, 239 करमाळा येथे 77 तर सांगली येथे स.क्र.215/3 येथे 74 सदनिका अशा एकूण 961 सदनिकांसाठी अर्ज भरता येतील. तर म्हाडा अंतर्गत पुणे येथील मोरवाडी पिंपरी येथे 87, पिंपरी वाघेरे येथे 992 अशा एकूण 1079 सदनिका आहेत. तसेच सांगली  येथे 129 सदनिका आहेत.प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या योजतेंतर्गत पुणे जिल्हयात महाळुंगे येथे 1880, दिवे येथे 14 तर सासवड येथे 4 सदनिका आहेत. तसेच सोलापूर जिल्हयात 82 सदनिका आहेत, अशा एकूण 1980 सदनिका आहेत.

20 टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत पुणे महानगरपालिका येथे 410, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे 1020 तर कोल्हापूर महानगरपालिका येथे 68 अशा एकूण 1498 सदनिका आहेत. तरी इच्छूकांनी 10 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून  ते 11 जानेवारी 2021 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत https://lottery.mhada.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी, असे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी कळविले आहे.

टॅग्स :Puneपुणेmhadaम्हाडाHomeघरAjit Pawarअजित पवार