शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Pune Metro: पुणे मेट्रोने गाठले डेक्कन अन् दापोडी; उर्वरित मार्गही लवकरच सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 11:56 IST

स्वातंत्र्यदिनी ८७ हजाराहून अधिक प्रवाशांंनी घेतला लाभ

पुणे : मेट्रो अखेर वनाज ते डेक्कन आणि पिंपरी ते दापोडीपर्यंत धावली. स्वातंत्र्याच्या अमृतमहाेत्सवाचे औचित्य साधून साेमवारी (दि. १५) वरील दोन्ही ठिकाणी चाचणी घेतली आणि ती यशस्वी देखील झाली. या दोन्ही मार्गांवर सोमवारी एका दिवसात ८७ हजारांहून अधिक नागरिकांनी प्रवास केला.

दरम्यान, मेट्रोच्या वनाज ते गरवारे महाविद्यालय व पिंपरी ते फुगेवाडी या दोन्ही मार्गांचे दि. ६ मार्च राेजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले हाेते. हे दोन्ही मार्ग प्रत्येकी ५ किलोमीटरचे आहेत. त्यामुळे सुरुवातीला महिना वगळता दोन्ही मार्गांवरील प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाला होता. त्यामुळेच दोन्ही मार्ग किमान एक स्थानक पुढे त्वरित सुरू करावेत, अशी मागणी होत होती.

मेट्राेतील धम्माल

- महामेट्रोने त्यासाठी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधत सोमवारी सकाळी या दोन्ही मार्गांची चाचणी घेण्यात आली. वनाजपासून सुरू झालेली मेट्रो गरवारे स्थानक पार करून डेक्कन स्थानकापर्यंत नेण्यात आली. त्याचवेळी पिंपरी स्थानकापासून सुरू केलेली मेट्रो फुगेवाडी स्थानक पार करून दापोडीपर्यंत गेली. यावेळी गाड्यांचा वेग ताशी १५ किलोमीटर असा होता. दोन्ही चाचण्या यशस्वी झाल्या.- या दोन्ही मार्गांवर सोमवारी दिवसभरात ७५ हजार प्रवाशांचे उद्दिष्ट होते, प्रत्यक्षात ही संख्या महामेट्रोने सायंकाळीच पार केली. रात्री उशिरापर्यंत मेट्रो धावत होती. सकाळपासून दर अर्ध्या तासाने सुरू असलेल्या मेट्रोमधून दोन्ही मार्गावर ८७ हजार पेक्षा जास्त नागरिकांनी प्रवास केला. त्यात लहान मुलांपासून, महाविद्यालयीन युवक-युवती, कुटुंबांचाही समावेश होता.- महामेट्रोने सोमवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त मेट्रोत वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यासही मुभा दिली होती. त्याचाही लाभ मुला-मुलींच्या ग्रुपनी घेतला. कविता तसेच किस्से वगैरे गोष्टी करत अनेकांनी मेट्रोच्या प्रवासाची परतीचे तिकीट काढत धम्माल केली. मेट्रोचे या आधीचे दोन्ही मार्गांची मिळून एका दिवसाची प्रवासी संख्या ६७ हजार २८० होती. सोमवारी एका दिवसात या दोन्ही मार्गावर मिळून ८७ हजार ९९३ जणांनी प्रवास केला.

''मेट्रोचे उर्वरित मार्गही त्वरित सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मेट्रो हा जगभरात मान्य झालेला सर्वोत्तम उपाय आहे. डेक्कन ते सिव्हिल कोर्ट स्थानकापर्यंत आणि दापोडी ते शिवाजीनगरपर्यंतचे कामही गतीने सुरू असून तोही मार्ग लवकरच सुरू करण्यात येईल. - ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक. महामेट्रो'' 

टॅग्स :Metroमेट्रोpassengerप्रवासीticketतिकिटMONEYपैसाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका