शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Pune Metro: कमी पैशात अन् कमी वेळेत प्रवासी पोहोचणार मेट्रो स्थानकात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 13:06 IST

मेट्रोच्या प्रवाशांना स्थानकापर्यंत घेऊन येण्यासाठी पीएमपीएलची वाहतूक सेवा सोमवारपासून सुरू

पुणे : मेट्रोच्या प्रवाशांना स्थानकापर्यंत घेऊन येण्यासाठी पीएमपीएलची वाहतूक सेवा सोमवारपासून सुरू झाली. या कामासाठी पीएमएपीलशिवाय ‘महामेट्रो’ने आतापर्यंत २४ वेगवेगळ्या संस्थांबरोबर करार केला आहे. त्यातील सायकल, बाईक, रिक्षा या सेवांनाही सुरुवात झाली. 

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित व पीएमपीएलचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा तसेच दोन्ही संस्थांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. गरवारे स्थानकाजवळ डॉ. दीक्षित व मिश्रा यांच्या हस्ते पीएमपीएलच्या गाड्या सुरू करण्यात आल्या. पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी दरम्यानही पीएमपीएलने ही सेवा दिली आहे. पिंपरी, संत तुकाराम नगर, भोसरी, फुगेवाडी, गरवारे कॉलेज, नळस्टॉप या सहा मेट्रो स्थानकांसाठी वर्तुळाकार मार्गाने पीएमपीएलची सेवा असेल. ५ ते ८ किलोमीटर अंतराच्या या सेवेसाठी ५ ते १० रुपये असे प्रवास शुल्क आहे. प्रवाशांची मागणी वाढल्यास हे अंतर १० किलोमीटरपर्यंत वाढविण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.

याशिवाय ई-सायकल, सायकल, ई-बाईक, ई-ऑटोरिक्षा, ऑटोरिक्षा, कॅब, मिनीबस या ६ सेवांसाठी महामेट्रोने २४ संस्थांबरोबर करार केला आहे. स्थानकात येणाऱ्या व स्थानकापासून जाणाऱ्या मेट्रो प्रवाशांना अल्प दरात या संस्था ही सेवा पुरवतील. पीएमपीएल, मेट्रो तसेच या अन्य प्रवासी सुविधा या सर्वांसाठी शुल्क अदा करताना एकच स्मार्ट कार्ड चालेल अशीही  व्यवस्था महामेट्रोच्या वतीने करण्यात येत आहे. पीएमपीएलसह या सर्व प्रवासी सेवांचा वेळ व मेट्रोचा वेळ यांचा समन्वय साधूनच वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. 

टॅग्स :Metroमेट्रोPMPMLपीएमपीएमएलSocialसामाजिकpassengerप्रवासीticketतिकिट