शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

Pune Metro : हडपसर बस डेपो ते सासवड मेट्रो मार्ग बोगद्यातून जाणार; १६ मेट्रो स्थानके होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:36 IST

१६ किलोमीटर मार्गासाठी ५,७०४ कोटींचा खर्च

पुणे :पुणेमेट्रो टप्पा-२ खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या उपमार्गिकांना मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. हडपसर-लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड कॉरिडोर तयार करताना बोगद्याद्वारे हा मार्ग पुरंदर एअरपोर्टपर्यंत नेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्याचबरोबर पुरंदर एअरपोर्ट येथे जाण्यासाठी रस्ते तसेच मेट्रोचे मल्टिलेव्हल इंटेग्रेशन करून पार्किंग सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.

मेट्रोच्या हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन उपमार्गिका एकूण १६ किलोमीटर लांबीच्या असून, त्यामध्ये एकूण १४ उन्नत स्थानकांचा समावेश आहेत. या दोन्ही उपमार्गिकांसाठी ५,७०४ कोटी रुपये खर्च येणार असून, या पूर्णतः उन्नत मेट्रो प्रकल्प महामेट्रोमार्फत कार्यन्वित करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. याबरोबरच पुणे मेट्रोचे जाळे पूर्वेकडे आणखी विस्तारित होणार असून, शहराच्या पूर्व परिसरासह ग्रामीण भागालाही मेट्रो सेवेचा लाभ मिळणार आहे. यामुळे भविष्यात लाखो प्रवाशांना जलद आणि सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

तत्काळ भूसंपादन करण्याचे आदेश

पुण्यात मेट्रोचे जाळे तयार करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. पुणे चिंचवड महानगरपालिका ते निगडी या ४.४ किमी लांबीची इलिव्हेटेड मेट्रोचे काम हाती घेण्यात आले असून, हा प्रकल्प जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार आहे.

स्वारगेट ते कात्रज ही अंडरग्राऊंड मेट्रो मार्च २०२९ पर्यंत पूर्ण होणार आहे. वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी हा कॉरिडोर जुलै २०२९ पर्यंत पूर्ण होणार आहे. पुणे मेट्रो लाइन ३ चे लवकर पूर्ण करून खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला या प्रकल्पासाठी तत्काळ भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

उपनगरातील नागरिकांना दिलासा

पुणे मेट्रो टप्पा - २ अंतर्गत होणाऱ्या या दोन उपमार्गिकांमुळे हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर आणि सासवड या वाढत्या उपनगरांना मेट्रो जोडल्या वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना जलद वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे. वाहतूककोंडीमुळे बेजार झालेल्या प्रवाशांचा वेळ वाचेल आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Metro: Hadapsar-Saswad route approved, 16 stations via tunnel.

Web Summary : The Pune Metro Phase 2's Hadapsar-Saswad route, with 16 stations, has been approved. The route will go through a tunnel. This metro will connect to Purandar Airport with multi-level integration. The project costs ₹5,704 crore and aims to ease traffic congestion and extend metro access to rural areas.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMetroमेट्रोPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र