शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

पुणे मेट्रो मार्गिका ३ प्रकल्पाच्या सवलत करारनाम्यावर स्वाक्षऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 4:35 PM

या प्रकल्पामुळे पुण्यातील जीवनमानामध्ये सकारात्मक परिवर्तन घडून येणार आहे.

ठळक मुद्देपुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) व टाटा-सिमेन्स यांचा सहभाग

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा ( पीएमआरडीए ) कडून राबविण्यात येणारा पुणे मेट्रो मार्गिका ३ (हिंजवडी ते शिवाजीनगर) हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकसित करण्यासाठी प्राधिकरणाने ट्रील  अर्बन ट्रान्सपोर्ट  ( टाटा रियल्टी अँडइन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची उपकंपनी) आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेन्चर्स जीएमबीएच ( सीमेन्स फायनान्शियल सर्व्हिसेसची उपकंपनी) यांच्या संयुक्त भागीदारीसोबत या प्रकल्पाच्या सवलत करारनाम्यावर शनिवारी( दि. २१)   स्वाक्षऱ्या केल्या.सार्वजनिक खाजगी भागीदारीद्वारे संकल्पना/रचना करा, बांधा, वित्तपुरवठाकरा, चालवा आणि हस्तांतरण करा (डीबीएफओटी) या तत्वावर हा प्रकल्प विकसित करण्यात येत असून कराराचा कालावधी सुरवातीस ३५ वर्षांचा असणार आहे. पुण्यात पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात प्राधिकरणामार्फत महानगर आयुक्त श्री. विक्रम कुमार यांनी या महत्वपूर्णकरारावर स्वाक्षरी केली. याप्रसंगी महाराष्ट्र शासन, पीएमआरडीए तसेच टाटाव सीमेन्सचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.ही अत्याधुनिक मेट्रो मार्गिका २३.३ किमी. लांबीची आहे.हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे पुणेकरांना सक्षम वाहतुक यंत्रणा,सुविधाजनक प्रवास आणि वेळेची लक्षणिय बचत असे अनेक फायदे मिळतील.एमआयडीसी, पीएमआरडीए, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका अशा ४ संस्थांच्या परिक्षेत्रातून ही मेट्रो धावणार आहे.

पुढील साडेतीन वर्षांत प्रकल्पाचे बांधकाम करण्यात येणार असून प्रकल्पाच्या बांधकाम कालावधीत वाहतूक व्यवस्थेत फारसे अडथळे येऊ नयेत या दृष्टीने सवोर्तोपरी काळजी घेण्यात येत आहे. प्राधिकरणाने टाटा सीमेन्स हा सवलतदार व इतर शासकीय संस्था तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सोबत समन्वय साधून पर्यायी मार्गाची आखणी केली आहे. मेट्रोच्या कारडेपो आणि सेवा रस्त्यांसाठी मुळशी तालुक्यातील माण येथे भूसंपादन सुरु करण्यात आले असून प्रस्तावित २३ स्थानकांची यादी सहपत्र - १ मध्ये जोडली आहे. मेट्रो मार्गिका  ३  सारखा व्यापक  प्रकल्प हाती घेतल्याने प्राधिकरण स्थापनेच्या मूळ  उद्देशास चालना मिळाली आहे. या प्रकल्पामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर हे अंतर चाळीस मिनिटांमध्ये पार करता येईल. तसेच मेट्रो प्रकल्पामुळे रस्त्यावरील खासगी वाहने कमी होऊन कार्बन उत्सर्जन व प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. मेट्रो प्रकल्पांसोबतच पुणे मुंबई हापरलूप, रिंग  रोड  यांसारख्या दळणवळण व पुणे महानगराच्या  सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण अश्या प्रकल्पांचे नियोजन प्राधिकरणामार्फत करण्यात येत आहे, अशी माहिती महानगर आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.याप्रसंगी टाटा सन्सच्या इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स अँड एरोस्पेसचेप्रेसिडेंट बनमाली अग्रवाल यांनी सांगितले, "कोणत्याही देशाची प्रगती तेथील पायाभूत सोयीसुविधांवर अवलंबून असते.  वाहतुकीचे शाश्वत आणि सक्षम नेटवर्क पुरवून लोकांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणण्याच्या सरकारच्या उपक्रमांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे.  पुणे हे देशातील महत्त्वाचे शहर असून स्मार्ट सिटीज मिशनमध्ये देखील त्याचा समावेश आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे की पुणे मेट्रो मार्गिका ३ मुळे पुण्यातील पायाभूत सोयीसुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा घडून येतील.  वेगवान आणि सुविधाजनक प्रवासामुळे लोकांचे जीवन सुखकर होईल. ..........हा प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून राबविण्यात येत असून केंद्र सरकारच्या २०१७ च्या नवीन मेट्रो रेल धोरणांतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) केला जात असलेला देशातील हा पहिला मेट्रो प्रकल्प आहे. मेट्रो प्रकल्पाची मार्गिका संपूर्णत: उन्नत असून हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्कपासून सुरु होऊन बालेवाडीमार्फत शिवाजीनगरपर्यंत जाईल. टाटा-सिमेन्स या जागतिक दर्जाच्या मोठ्या संस्था एकत्रितपणे पुढील साडेतीन वर्षांत प्रकल्पाचे काम पूर्ण करणार असून त्यांना सुरवातीस पस्तीस वर्षे मुदतीसाठी प्रकल्प चालवण्यासाठी देण्यात येणार आहे.याप्रसंगी सीमेन्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर व चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सुनील माथूर म्हणाले, "अतिशय प्रतिष्ठेच्या मेट्रो प्रकल्पात पीएमआरडीएसोबत काम करायला मिळणे ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. या प्रकल्पामुळे पुण्यातील जीवनमानामध्ये सकारात्मक परिवर्तन घडून येणार आहे.  टाटा समूहासोबत भागीदारीमार्फत आम्ही अत्याधुनिक मेट्रो व्यवस्थेला आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा पुरविणार आहोत ज्यामुळे पुण्यातील वाहतूक यंत्रणेत आमूलाग्र विकास घडून येईल.

टॅग्स :Puneपुणे