शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
2
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
3
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
4
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
5
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
6
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
7
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
8
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या
9
"आम्हाला सांगण्याऐवजी तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांचे रक्षण करा"; भारताने बांगलादेशला सुनावले
10
IPL 2025: भाई... हा नशेत आहे का?; अर्जुन तेंडुलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
11
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
12
Shani Dev: शनिशिंगणापुरला शनि मंदिराचा चौथरा आहे पण छप्पर नाही; असे का? जाणून घ्या कारण...
13
IPL 2025: रोहित शर्माचा धमाका! Mumbai Indiansमधून 'असा' विक्रम करणारा केवळ दुसराच
14
IPL 2025 : MS धोनीच्या CSK संघात बदल! MI च्या संघातून खेळलेल्या 'बेबी एबी'वर खेळला मोठा डाव
15
Astro Tips:थाटामाटात लग्न करून वर्षभरात होणारे घटस्फोट थांबवण्यासाठी 'हे' मुद्दे वेळीच लक्षात घ्या!
16
“हिंदू, हिंदी, हिंदूराष्ट्र लादण्याचा BJPचा अजेंडा, भाषेची सक्ती रद्द करा”: हर्षवर्धन सपकाळ
17
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
18
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
19
IPL ची आजच झाली होती सुरुवात! फक्त ४ क्रिकेटपटू खेळू शकलेत सर्व १८ सीझन, पाहा यादी
20
Sant Dnyaneshwaranchi Muktai Review : मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली..., जाणून घ्या कसा आहे 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'

पीडितांची वैद्यकीय चाचणी एका दिवसातच होणे गरजेचे; पोलिस आयुक्तांनी महिला आयोगाकडे सुचवला उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 12:35 IST

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेने महिला डॉक्टरने तिची तपासणी का केली नाही

पुणे : बलात्कार पीडितांची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणीदरम्यान हेळसांड होत असल्याचा प्रकार समोर आला होता. स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर पीडितेने देखील वैद्यकीय चाचणीवेळी महिला डॉक्टरांची उपस्थिती गरजेची असल्याची मागणी केली होती. त्यातच पीडितांच्या वैद्यकीय चाचणीला ससून प्रशासनाकडून दोन ते तीन दिवस लागत असल्याने ही वैद्यकीय चाचणी एका दिवसातच पूर्ण करण्यात यावी, असा उपाय पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना सुचवला आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सोमवारी (दि. ७) सकाळी पुण्यातील महिला सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. यावेळी पोलिस आयुक्तांनी शहरातील महिला सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजनांबरोबरच पीडितांना ससूनमध्ये वैद्यकीय चाचणीसाठी लागणारा वेळ यावर भूमिका स्पष्ट केली.स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेने महिला डॉक्टरने तिची तपासणी का केली नाही हा मुद्दा पुढे आणल्यानंतर पोलिस आयुक्तांनीही याला तेवढेच महत्त्व दिले आहे. ससून रुग्णालयात पीडितांची वैद्यकीय तपासणी करताना ही तपासणी महिला डॉक्टरांकडूनच करण्यात यावी. त्या ठिकाणी महिला डॉक्टर आणि नर्स उपलब्ध असाव्यात. महिला डॉक्टर नसेल तर दुसऱ्या रुग्णालयातून बोलवून पीडितांनी वैद्यकीय चाचणी व्हावी. पीडितांवर करण्यात येणारे उपचार आणि त्यांची होणारी वैद्यकीय चाचणी ही वेगवेगळी ठेवावी. या ठिकाणीही महिला डॉक्टर्स आणि नर्स उपलब्ध असाव्यात, असे उपाय आयुक्तांनी सुचवले आहेत.

२८४ ठिकाणी स्ट्रीट लाइट

महिला सुरक्षेच्या दृष्टीने बोपदेव घाटासह गुन्ह्यांचे हॉटस्पॉट आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. शहरातील २८४ ठिकाणी स्ट्रीट लाइट बसवण्याचे प्रस्तावित असल्याचेही आयुक्तांनी सुरक्षेच्या आढावा बैठकीत महिला आयोगाच्या अध्यक्षांना माहिती दिली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीswargate bus depotस्वारगेट बसस्थानकRupali Chakankarरुपाली चाकणकरPune Crimeपुणे क्राईम बातम्या