शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:23 IST

कुंडमळा येथे रविवारी जुना पूल कोसळून चौघांचा मृत्यू झाला, तर ५० जण जखमी झाले.

सचिन ठाकरलोकमत न्यूज नेटवर्क

पवनानगर (जि. पुणे) : कुंडमळा येथे रविवारी जुना पूल कोसळून चौघांचा मृत्यू झाला, तर ५० जण जखमी झाले. पुलाच्या दोन्ही बाजूंनी दुचाकीस्वार पर्यटकांनी हुल्लडबाजी करत प्रवेश केला. त्यावेळी पुलावरच्या गर्दीत अनेकजण अडकले. त्यांचा प्रचंड भार पुलावर आल्याने काही क्षणातच पूल कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

रविवार असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक जमले होते. भार सहन झाल्याने पुलाचा काही भाग दगडांवर, तर काही भाग थेट पाण्यात कोसळल्याने बऱ्याच जणांना गंभीर दुखापती झाल्या. काही किरकोळ जखमींवर प्राथमिक उपचार करून घरी सोडले आहे, तर काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

आम्ही सात मित्र फिरायला आलो होतो. पुलावर गर्दी होती. दुचाकीस्वार ये-जा करत होते. अचानक पूल कोसळला. मी दगडावर आपटलो, पाय व कंबरेला दुखापत झाली. तशा अवस्थेत मी दोघांना बाहेर काढले, अशी माहिती विजय संतोष येणकर (जखमी) यांनी दिली.

मी चाकणमधील कंपनीत काम करतो. मित्रांसोबत फिरायला आलो होतो. पुलावर उभी असतानाच पूल खाली पडला. मी पाण्यात पडलो. लोकांच्या मदतीने बाहेर आलो. त्यानंतर बेशुद्ध झालो. आता रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे, असे प्रथमेश पालकर (जखमी) म्हणाले.

तळेगावला मुलीला भेटायला आलो होतो. तेथून कुंडमळा येथे गेलो असता अचानक पुलावर गर्दी झाली आणि पूल कोसळला. डोक्याला मार लागला. पतीचा पाय लोखंडी पाइपमध्ये अडकला, तर मुलीला खरचटले, असे  वैशाली वैभव उपाध्ये (जखमी) यांनी सांगितले.

कासारवाडीहून फिरायला आले होते. हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांनी मोठ्या आवाजात हॉर्न वाजवत दुचाकी पुलावर आणल्या. अचानक पूल कोसळला. माझ्या अंगावर दुचाकी पडली. माझ्या पाठ व पायाला दुखापत झाली, असे या दुर्घटनेतून थोडक्यात बचावलेल्या शिल्पा भंडारेलू यांनी म्हटले.

गर्दीचे वजन न पेलल्यानेच पूल नदीत कोसळलाइंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील साकव पुलावर गर्दी झाली आणि वजन न पेलवल्याने पूल कोसळला आहे. दुर्घटनेआधीचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यातून गर्दीमुळेच अपघात झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, या छायाचित्राबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. पावसाळ्यात या पुलावर गर्दी जमते. रविवारीही पुलाच्या दोन्ही बाजूंनी मोठी गर्दी झाली होती. पर्यटकांबरोबरच दुचाकी वाहने उभी केली होती. त्यामुळे वजन न पेलवल्याने पूल तुटून पाण्यात कोसळल्याचे दिसून येत आहे. 

लोखंडी सांगाडा अद्याप नदीपात्राच्या खोल भागातचमावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील जुना पूल कोसळून रविवारी चारजणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफच्या पथकांकडून रात्री अकरापर्यंत बचावकार्य सुरू होते. त्यानंतर सोमवारी सकाळी साडेनऊपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. नदीपात्रात दोन ड्रोनच्या साहाय्याने शोध घेण्यात आला.दुर्घटनेतील चार मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. यामध्ये ५१ जण जखमी झाले आहेत. स्थानिकांनी तीन जणांना, तर बचाव पथकांनी पुलाखाली अडकलेल्या एका व्यक्तीला वाचविले. दरम्यान, पुलाचा लोखंडी सांगाडा नदीपात्राच्या खोल भागातून काढण्यात पाण्याच्या प्रवाहाचा आणि पावसाचा अडथळा होत होता. काही भाग कटरने कापण्यात आला. त्यानंतर सांगाडा पाण्यातून वर उचलण्यात आला. मात्र, तो पूर्णपणे नदीपात्रातून बाहेर काढण्यात आलेला नाही. पाऊस थांबल्यानंतर कटरने तोडून तो काढण्यात येणार आहे.

पोलिस बंदोबस्त तैनातबघ्यांची तोबा गर्दी होत असल्याने पोलिसांनी खबरदारी म्हणून घटनास्थळी बॅरिकेड्स लावले आहेत. तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे आणि राखीव दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. रायगडच्या व स्थानिक बचाव पथकांकडून शोधकार्य सुरू आहे. मनाई आदेशाची अंमलबजावणी सुरू आहे.

टॅग्स :mavalमावळPuneपुणेAccidentअपघात