शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 14:01 IST

Pune Maval Bridge Collapse News: पुण्यातील इंद्रायणी नदीत पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली.

इंद्रायणी नदीत कोसळलेल्या कुंडमळा पुलाचा लोखंडी सांगाडा बाहेर काढण्यासाठी सुरुवातीला तीन क्रेन बोलावण्यात आल्या. मात्र, त्यांच्याकडून सांगाडा बाहेर निघाला नाही. त्यानंतर जास्त क्षमतेची क्रेन मागविण्यात आली. तोपर्यंत अंधार झाला होता. त्यामुळे विद्युत दिव्यांच्या प्रकाशात सांगाडा हलविण्याचे काम सुरू होते. क्रेनच्या साह्याने सांगाडा बाहेर काढण्यात अडचणी येत असल्याने कटरच्या साह्याने सांगाडा कापण्यात आला. त्यानंतर मोठ्या क्षमतेच्या क्रेनच्या साह्याने सांगाडा नदीतून बाहेर काढण्याचे काम सुरू होते.

पुलाच्या सांगाड्याखाली काहीजण अडकले होते. बचाव पथकांनी त्यांना दोरीच्या साह्याने बाहेर काढले. तसेच सायंकाळपर्यंत दोन मृतदेह काढण्यात आले. त्यात एका मुलाचा मृतदेह असल्याचेही पोलिसांनी सांगितले. मावळ परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे इंद्रायणी नदीची पाणीपातळी वाढली असून, प्रवाह प्रचंड वेगवान झाला आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. एनडीआरएफची तुकडी आल्यानंतर बचावकार्याला वेग आला. राज्याचे मंत्री गिरीश महाजन, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे, भंडारा डोंगर देवस्थान अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांनी घटनास्थळाला भेट दिली.

पूल कोसळण्याचे कारण अद्याप अस्पष्टया पुलाची बांधणी किती वर्षांपूर्वी झाली होती, त्याची देखभाल कितपत केली जात होती, याबाबत सध्या काहीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे. २४ तास मदतकक्ष सुरू: तहसील कार्यालय, मावळ येथे आपत्ती व्यवस्थापनांतर्गत २४ तास मदत कक्ष कार्यरत आहे. नागरिकांनी मदतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा : हेल्पलाइन क्रमांक: ०२११४-२३५४४०.

टॅग्स :mavalमावळPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र