पुणे: लोकसभा निवडणुकीच्या तिसºया टप्प्यांसाठी राज्यात मतदान होत असून पुण्यातही अनेक कलाकार मंडळींनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे ,अभिनेता सुबोध भावे, ज्येष्ठ सिने अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर, संध्या गोखले ,अभिनेत्री गौतमी देशपांडे, तुला पाहते रे फेम गौतमी दातार, सुयश टिळक, मेघराज राजे भोसले, ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे, शास्त्रीय गायक पं. राहुल देशपांडे यांसारख्या कलाकारांसह सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, मतदान करत आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले आहे.
आज आम्ही पहाटे 4.30 वाजता मुंबईतून निघालो, पुण्यात पोचलो आणि मतदान केले. आता आपापल्या कामासाठी पुन्हा मुंबईला रवाना होणार आहे. तेव्हा सर्वांनी कोणतीही कारणे न देता मतदानासाठी बाहेर पडा आणि लोकशाहीचा उत्सव आपले अमूल्य मत देऊन साजरा करा.- सुबोध आणि मंजिरी भावे
............
मी सकाळी ७.३० वाजताच सदाशिव पेठ येथे मतदान करून आले. सर्वांनी आवर्जून मतदान करायला जा. सोबत पिण्याच्या पाण्याची बाटली बाळगा, उन्हापासून शरीराचे संरक्षण व्हावे यासाठीही काळजी घ्या. अभिनेत्री गौतमी देशपांडे