शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Pune Lockdown : पुण्यातील कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील: अजित पवारांकडून चेंडू उद्धव ठाकरेंच्या कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 15:31 IST

महापौरांनी कोर्टात जावे; अजित पवारांचं प्रत्युत्तर

पुणे : राज्य सरकारने पुणे शहरासंदर्भात कोरोना रूग्णांची आकडेवारी सादर केली होती.त्यावर आक्षेप नोंदवत न्यायालयाने पुण्यात कडक लॉकडाऊन लावावा अशा सूचना राज्य सरकारला केल्या होत्या. मात्र यावर राज्य सरकारने पुणे शहराची चुकीची आकडेवारी सादर केली असा आरोप करत पुण्याच्या महापौरांनी केला होता. तसेच आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत या असेही ते म्हणाले होते. आता राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महापौरांनी तातडीने कोर्टात जावे असे सांगितले. तसेच पुण्याच्या लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी भूमिका जाहीर करत लॉकडाऊनचा चेंडू थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात भिरकावला आहे. 

पुण्यात शुक्रवारी कोरोना आढावा बैठकीचे आयोजन अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कऱण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते .पवार म्हणाले,  पुणे शहराचे आकडे तिथे जात नाही. तर पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण अशी सर्व मिळून आकडेवारी जाते. महापौरांना काय वाटते ते त्यांनी मत व्यक्त केले. त्यांनी तातडीच्या कोर्टात जावे असे मला वाटते. पण न्यायालयाने काय सांगितले तेच मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागरिक वेगवेगळे कारणे सांगत घराबाहेर पडतात असे पोलसाांचे मत आहे. मात्र,आता हायकोर्टाने सूचना केल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. कारण नसताना बाहेर फिरतात त्यांच्यावर कारवाई झाली तर फरक पडेल असेही पवार यांनी यावेळी सांगितले. 

पुण्यातील कडक लॉकडाऊन अजित पवार म्हणाले... मी पुण्यातील कडक लॉकडाऊनबाबत तसे सूतोवाच केले आहे. अनेक नेत्यांचं देखील तेच मत आहे. पोलिसांशी आम्ही बोललो. त्यांच्या काही अडचणी आहे.सध्या हायकोर्टाने सूचना केल्या आहे.पुण्याच्या लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. कारण नसताना फिरणाऱ्या लोकाची संख्या कमी झाली पाहिजे. 

बारामतीत संख्या वाढली म्हणून कडक लॉकडाऊन 

बारामतीत दिवसागणिक कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत होती.तिथली भौगोलिकता बेड आरोग्य सुविधा पाहून अधिकाऱ्यांनी सांगितले.त्यामुळे तिथे लॉकडाऊनचा निर्णय घेतला.

पुण्याच्या महापौरांनी नेमका काय आरोप केला होता राज्य सरकारवर.....

कोरोना आढावा बैठकीपूर्वी महापौर मोहोळ यांनी राज्य सरकारवर हा गंभीर आरोप केला होता. कोरोना निर्मूलन कामात पुणे शहराने देशात गौरव व्हावा असे आदर्श काम केले. सरकारने त्याची दखल घेतली नाही. उलट न्यायालयात पुणे शहरात १ लाख रूग्ण आहेत असे सांगितले. ही आकडेवारी जिल्ह्याची आहे. फक्त पुणे शहराची नाही हे सरकारने स्पष्ट केले नाही. त्यामुळेच न्यायालयाने कडक लॉकडाऊन करण्याविषयी सांगितले असा दावा मोहोळ यांनी केला. राज्य सरकारने पुणे शहराची चुकीची आकडेवारी न्यायालयात सादर करत महापालिकेची, पर्यायाने शहराची प्रतिमा खराब करण्याचा प्रकार आहे असा आरोप देखील महापौरांनी केला होता.

 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौरAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरे