शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

Pune Lockdown : महाराष्ट्राबाहेरील नागरिकांना पुण्यात प्रवेशासाठी आता कोरोना निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 10:36 PM

ब्रेक दि चेन अंतर्गत पुणे महापालिका प्रशासनाचा नवीन सुधारित आदेश...

पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढले होते. कोरोनाचा झपाट्याने वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी पुणे महापालिका व जिल्हा प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहे.याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. ब्रेक दि चेन अंतर्गत आता महाराष्ट्राबाहेरील कोणत्याही व्यक्तीला पुणे शहरात प्रवेश करताना कोरोना निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली आहे. 

पुणे महापालिका प्रशासनाने याबाबतचा नवीन आदेश काढला आहे. या आदेशात नमूद केल्याप्रमाणे  महाराष्ट्राबाहेरील राज्यातून पुणे महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही वाहतुकीच्या साधनामार्फत प्रवेश करणाऱ्या व करू इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांना पालिका क्षेत्रात येण्यापूर्वी ४८ तास वैधता असणारे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहणार आहे. 

राज्य शासनाचा जिल्हाबंदीचा आदेश....राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने अत्यावश्यक कारणासाठी जिल्ह्याबाहेर जाणार्‍यांसाठी डिजिटल पासची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे पासासाठी अर्ज केल्यानंतर अर्जाची संख्येनुसार तो २४ तासाच्या आत मंजूर होतो. आत्तापर्यंत लाखांवर नागरिकांनी ई पाससाठी अर्ज केला आहे. जिल्ह्याबाहेर जायचे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे ई पास आवश्यक आहे. जिल्ह्याच्या शहराच्या सीमेवर तुम्हाला अडविल्यास व तेथे तुमच्याकडे ई पास नसल्यास तेथून तुम्हाला परत माघारी पाठविले जाऊ शकते.

लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम....

पुण्यात राबविण्यात येत असलेल्या लॉकडाऊनचे चांगले परिणाम दिसून येऊ लागले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. असे असले तरी अजूनही ही संख्या खूप कमी झालेली नाही. त्यामुळे शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक कडक होणार आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांना मोकळीक दिली आहे. दुपारपासून रस्त्यावर आलेल्या प्रत्येक नागरिकांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले  आहे......

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्त