Pune: हौदबागमध्ये बिबट्या जेरबंद, अजून तीन बिबट्या असल्याचा संशय; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 08:24 IST2024-03-25T08:21:37+5:302024-03-25T08:24:01+5:30
बेल्हा ( पुणे ) : बेल्हा (ता. जुन्नर) येथील कळस रोडवरील हौदबागमध्ये आज पहाटे एक बिबट्या जेरबंद झाला. या ...

Pune: हौदबागमध्ये बिबट्या जेरबंद, अजून तीन बिबट्या असल्याचा संशय; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
बेल्हा (पुणे) : बेल्हा (ता. जुन्नर) येथील कळस रोडवरील हौदबागमध्ये आज पहाटे एक बिबट्या जेरबंद झाला. या बाबतची माहिती अशी की, हौदबागमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्या येथील नागरिकांना दिवसा तसेच रात्री दिसत होता. तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ले सुरूच होते. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या ठिकाणी अमित बोरा यांच्या गट नं ४७/१ या शेतात वनखात्याच्या वतीने पिंजरा लावण्यात आला होता.
पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. या ठिकाणी अजुन तीन बिबटे असल्याचे संदीप शिंदे यांनी सांगितले. पिंजरा पुन्हा लावावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. वनखात्याने पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या माणिकडोह येथे नेण्यात आल्याचे वनरक्षक जे.टी.भंडलकर यांनी सांगितले.