Leopard Attack : शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्या जेरबंद! वन विभागासमोर मोठे आव्हान
By किरण शिंदे | Updated: December 10, 2025 09:47 IST2025-12-10T09:45:46+5:302025-12-10T09:47:16+5:30
Pune Leopard Attack: गेल्या काही महिन्यांपासून परिसरात बिबट्यांच्या हालचाली वाढल्या होत्या. यामुळे वन विभागाने विविध ठिकाणी पिंजरे लावून गस्त वाढविली होती.

Leopard Attack : शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्या जेरबंद! वन विभागासमोर मोठे आव्हान
पुणे - शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आणखी एका बिबट्याला यशस्वीपणे जेरबंद केले. सुमारे पाच ते सहा वर्षे वयाची ही मादी बिबट असून, यामुळे या परिसरातील पकडलेल्या बिबट्यांची संख्या तब्बल २४ वर पोहोचली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, गेल्या काही महिन्यांपासून परिसरात बिबट्यांच्या हालचाली वाढल्या होत्या. यामुळे वन विभागाने विविध ठिकाणी पिंजरे लावून गस्त वाढविली होती. बिबट्याला जेरबंद केल्यामुळे नागरिकांनी दिलासा व्यक्त केला असला तरी, अद्यापही या भागात बिबट्यांची संख्या अधिक असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वन विभागाचे अधिकारी सांगतात की, उर्वरित बिबट्यांना जेरबंद करणे हे मोठे आव्हान ठरणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सतत गस्त ठेवण्याबरोबरच, रात्रीच्या वेळी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच ग्रामीण भागात जनजागृती करून नागरिकांना सावधगिरीचे उपाय सांगितले जात आहेत.
परिसरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील असून, पुढील काही दिवसांत आणखी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.