शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

कात्रज उड्डाणपुलाचे काम डिसेंबर पर्यंत पुर्ण होणार; आमदार योगेश टिळेकरांनी केली उड्डाणपूल कामाची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 15:35 IST

राजीव गांधी प्राणी संग्रलायाच्या जागेत पिलर उभारुण्यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी घेतली.

कात्रज - कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम भूसंपादन व वाहतूक नियोजना अभावी रखडले होते. सध्या पिलर वरती गर्डर टाकण्याचे काम  सुरु आहे. उड्डाणपूल कामाची गती, येणाऱ्या अडचणी आणि त्यावर उपाय यासंदर्भात आमदार योगेश टिळेकर यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी करून कामा संदर्भात चर्चा केली. उड्डाणपुलाचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करावे अशा सूचना विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या.

यावेळी टिळेकर म्हणाले की,कात्रज ते मंतरवाडी रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग ५४८ डीडी घोषित केला. उड्डाणपूल व्हावा यासाठी पाठपुरावा केला.तसेच कात्रज चौकातील संजय गुगळे यांची जागा ताब्यात न आल्याने राजीव गांधी प्राणी संग्रलायाच्या जागेत पिलर उभारुण्यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी घेतली. या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर कात्रज चौक,कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.तसेच  २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेतील रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी वाहतूक पोलीस यांना वाहतूक नियोजन व परवानगी बाबत सहकार्य करण्याच्या सूचना पोलीस व पाणी पुरवठा अधिकार्यांना दिल्या आहेत.

यावेळी प्रभाकर कदम,माजी नगरसेविका वृषाली कामठे,माजी सरपंच व्यंकोजी खोपडे,तुषार कदम,विकास फाटे,राजू कदम,संदीप बेलदरे पालिका पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर,राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक,पोलीस उपायुक्त अमोल झेंडे,सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख,सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक शिल्पा लंबे,पाणी पुरवठा अधिकारी श्रीकांत वायदंडे,कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाणे,उपअभियंता दिलीप पांडकर,शाखा अभियंता शेख उपस्थित होते.

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी लक्षवेधी  कात्रज कोंढवा रस्ता रुंदीकरण ८४ मीटरच होणार असून मुख्य रस्ता व सेवा रस्ता अशा ५० मीटरमध्ये बाधित होणाऱ्या जागा मालकांना रोख मोबदला देण्यासाठी सात महिन्यांपूर्वी १४० कोटी राज्यसरकार ने दिले.पालिकेचे मिळून २८० कोटी निधी असताना दिरंगाई का या भूसंपादनासह रस्ता रुंदीकरणाला गती देण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधान परिषदेत लक्षवेधी मांडणार आहे.आवश्यक ३२ जागा ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मोबदला देवून ताब्यात घेण्यात येतील. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यास एका वर्षात कात्रज कोंढवा रस्ता पूर्ण होईल अशी माहिती आमदार योगेश टिळेकर यांनी दिली.

कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या पिलर वर गर्डर टाकण्याचे काम गतीने सुरु आहे.संपूर्ण उड्डाणपुलाचे गर्डर तयार आहेत. उड्डाणपूल उतरण्याच्या ठिकाणची जागा पालिकेने ताब्यात दिल्यास पावसाळ्यापूर्वी भराव टाकण्याचे काम पूर्ण होईल.डिसेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण करू. -श्रुती नाईक.कार्यकारी अभियंता.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकात्रज चौकातील संजय गुगळे यांची जागा ताब्यात घेतल्या नंतर तात्काळ रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे.सदर रस्ता डांबरीकरण ऐवजी कॉक्रीटीकरण करण्यात येणार आहे.एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रस्ता कॉक्रीटीकरण काम पूर्ण होईल.त्यानंतर पंधरा दिवसात वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. -अनिरुद्ध पावसकर.मुख्य अभियंता पथ विभाग 

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडkatrajकात्रजroad transportरस्ते वाहतूक