शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Pune Jumbo Covid Center: तुम्ही काय सहलीला आला का? पीएमआरडीए आयुक्तांनी‘लाईफलाईन’च्या डॉक्टरांना झापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 20:47 IST

आता वरिष्ठ-कनिष्ठ डॉक्टर्ससह नर्सेस आणि वॉर्डबॉय यांच्या निवासाकरिता फाईव्ह स्टार हॉटेल्सची मागणी

ठळक मुद्देनिवास आणि जेवणाच्या व्यवस्थेवरुन शासकीय व लाईफलाईनच्या अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी फाईव्ह स्टार निवासाची मागणी

पुणे : कोरोना रुग्णांसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर उपचारांचे कंत्राट देण्यात आलेल्या ‘लाईफलाईन’ च्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची  ‘लाईन’ संपण्याचे नाव घेत नाही. आता वरिष्ठ-कनिष्ठ डॉक्टर्ससह नर्सेस आणि वॉर्डबॉय करिता स्टार हॉटेल्सची मागणी केली आहे. या सर्वांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या होस्टेलवर राहण्यास नकार दिला आहे.  याविषयी पालिका-पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी लाईफलाईनच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यावेळी पीएमआरडीएच्या आयुक्तांनी खडसावत  ‘तुम्ही काय सहलीला आला आहात काय?  करारनाम्यात ठरल्याप्रमाणेच सुविधा मिळतील.’ असे स्पष्ट केले.

जम्बो सेंटरमधील वैद्यकीय मनुष्यबळ पुरविणे, रुग्णांवर उपचार करण्याचे कंत्राट लाईफलाईनला देण्यात आले आहे. येथील मनुष्यबळाची राहण्याची व्यवस्था अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या होस्टेलवर करण्यात आली होती. परंतू,  लाईफलाईनने  तेथे राहण्यास नकार दिला. त्यांची सात दिवसांच्या निवासाची व्यवस्था पीएमआरडीएने केली आहे. निवास आणि जेवणाच्या व्यवस्थेवरुन शासकीय अधिकारी आणि लाईफलाईनच्या अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. लाईफलाईनकडून वरिष्ठ डॉक्टर्ससाठी ५ स्टार, कनिष्ठ डॉक्टर्ससाठी ४ किंवा ३ स्टार,  नर्सेससाठी ३ स्टार आणि वॉर्डबॉय व तत्सम कर्मचाऱ्यांसाठी २ स्टार हॉटेल्सची मागणी केली आहे. यावर, पालिका आणि पीएमआरडीएने जे करारनाम्यात असेल त्याप्रमाणेच व्यवस्था केली जाईल असे स्पष्ट केले.

दरम्यान, पालिकेने जम्बो सेंटरमधील वैद्यकीय अधिकारी व पॅरामेडिकल कर्मचारी यांच्या जेवण, निवास व अन्य सुविधा पुरविण्यासाठी ४/५ स्टार, ३ स्टार व डिलक्स हॉटेल व्यवस्थापनाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. तशी जाहिरातही देण्यात आली आहे. सकाळी चहा, नाश्ता, दुपार व सायंकाळचे जेवण, सायंकाळी चहा यासह  वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खोलीमध्ये प्रतिदिन सॅनिटायझेशन करणे, स्वच्छता राखणे, लॉन्ड्री सुविधा पुरविणे आदी सुविधांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

एकीकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे तसेच शासकीय वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस आणि पॅरामेडिकल कर्मचारी सुविधा-असुविधांचा विचार न करता, तसेच उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये समाधान मानून काम करीत आहेत. एकीकडे जम्बो रुग्णालयातील वैद्यकीय मनुष्यबळासाठी पंचतारांकित सुविधा आणि दुसरीकडे पालिकेच्या मनुष्यबळाला मात्र साध्या केटरींगची सुविधा असा भेदभाव होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याविषयावरुन  नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलPMRDAपीएमआरडीएdoctorडॉक्टर