Video: पुण्यात उलटा पाऊस...नाझरे जलाशयातील पाणी आकाशात ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2018 13:32 IST2018-06-09T13:22:48+5:302018-06-09T13:32:08+5:30
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याला पावसाने झोडून काढले आहे. सर्वत्र ढगफुटीझाल्यासारखा मुसळधार पाऊस कोसळत असतानाच चर्चा रंगली आहे ती मात्र जेजुरी जवळच्या नाझरे जलाशयातील नैसर्गिक चमत्काराची.

Video: पुण्यात उलटा पाऊस...नाझरे जलाशयातील पाणी आकाशात ?
पुणे - पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याला पावसाने झोडून काढले आहे. सर्वत्र ढगफुटीझाल्यासारखा मुसळधार पाऊस कोसळत असतानाच चर्चा रंगली आहे ती मात्र जेजुरी जवळच्या नाझरे जलाशयातील नैसर्गिक चमत्काराची. तेथे जलाशयातील पाणी चक्राकार घुसळले जाऊन उलटे आकाशात फेकले जाताना दिसत आहे.
पुरंदर तालुक्यातील सर्वच भागात मुसळधार पाऊस झाला. एखादी ढगफुटी व्हावी असा पावसाचा जोर होता. यातच जेजुरी जवळच्या नाझरे जलाशयातील पाणी मात्र आकाशात जात असल्याचे आश्चर्यकारक दृश्य दिसत होते.अचंबित करणारे हे दृश्य अनेकांनी मोबाइलवर चित्रित ही केले आहे. जलाशयावर ढगफुटी झाली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. तर चक्रीवादळासारख्या प्रकारातून हे पाणी उलटे वर खेचले जात असावे असेही म्हटले जात आहे.