शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

Pune International Marathon: पुढील वर्षी २७ फेब्रुवारीला होणार; १८ वर्षांखालील खेळाडूंना परवानगी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 14:34 IST

स्पर्धकांच्या आरोग्यविषयक सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करण्याच्या प्रतिबद्धतेमुळे नेहमीप्रमाणे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवार ऐवजी पुढील वर्षी २७ फेब्रुवारीला ही शर्यत आयोजित करण्यात येणार आहे

ठळक मुद्दे शर्यतीसाठी १५ ऑक्टोबरपासून ऑनलाइन नावनोंदणीला सुरुवात होणारकोरोनाचा धोका लक्षात घेता १४, १६ आणि १८ वर्षांखालील गटाच्या शर्यती होणार नाहीत

पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन (Pune International Marathon) स्पर्धेत दरवर्षी लाखोंच्या संख्येने खेळाडू सहभागी होतात. कोरोना महामारीने या स्पर्धेत खंड पडला होता. पण सध्या कोविडची साथ ओसरत आहे. तरीदेखील स्पर्धकांच्या आरोग्यविषयक सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करण्याच्या प्रतिबद्धतेमुळे नेहमीप्रमाणे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवार ऐवजी पुढील वर्षी २७ फेब्रुवारीला ही शर्यत आयोजित करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेशी योग्य तो समन्वय साधून तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या कोविड सुरक्षेशी संबंधित सर्व नियमांचे काटेकोर पालन करून ही शर्यत होईल. अशी माहिती पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीच्या संयोजन समितीचे अध्यक्ष अभय छाजेड (Abhay Chajed) यांनी दिली आहे. 

या शर्यतीसाठी १५ ऑक्टोबरपासून (online) नावनोंदणीला सुरुवात होणार आहे. बाबुराव सणस मैदान ते नांदेड सिटी या नव्या मार्गावर २ लूपमध्ये ही शर्यत होईल. यंदा कोरोनाचा धोका लक्षात घेता १४, १६ आणि १८ वर्षांखालील गटाच्या शर्यती होणार नाहीत. केवळ १८ वर्षे वयोगटापुढील पुरुष व महिला स्पर्धकांसाठी ४२, २१, १० आणि ५ किलोमीटर बरोबरच व्हीलचेअर अशा पाच गटांच्याच शर्यती होणार आहेत. अशी माहिती पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीचे सहसंचालक गुरुबन्स कौर यांनी दिली.   

शर्यतीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी www.marathonpune.com  या संकेतस्थळाला भेट द्यावी. तेथे शर्यती संदर्भातील सर्व माहिती उपलब्ध असेल. ३१ जानेवारीपर्यंत नावनोंदणी करता येईल. ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक अर्ली बर्ड डिस्काउंट देण्यात येईल. याबाबतची सविस्तर माहिती वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

स्पर्धेविषयी अधिक माहिती - दोन डोस (corona vaccine) पूर्ण झालेल्या १८ वर्षांपुढील स्पर्धकांनाच प्रवेश असणार- नावनोंदणी केलेल्यांना रनिंग किट घरपोच मिळेल.- शर्यतीच्या मार्गावरील प्रत्येक पॉईंटवर सॅनिटायझेशन युनिट आणि तापमान मोजण्याची सुविधा उपलब्ध असेल.- प्रत्येक गटाची शर्यत वेगळी सुरू होईल.- केवळ एलिट गटाचा फ्लॅग ऑफ होईल. इतर गटांतील स्पर्धक आखून दिलेल्या कालावधीत त्यांच्या सोईनुसार शर्यत सुरू करू शकतील.- पारितोषिक वितरण होणार नाही- विजेत्या खेळाडूंची ट्रॉफी घरपोच पाठवण्यात येईल. विदेशी खेळाडूंची ट्रॉफी त्यांच्या निवासस्थानी पोहचविण्यात येईल.

टॅग्स :PuneपुणेMarathonमॅरेथॉनSocialसामाजिकcorona virusकोरोना वायरस बातम्याAbhay Chajedअभय छाजेड