पुणे : सिंहगड रोड परिसरात जीबीएस प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे पालिकेने नांदेड गाव, बारांगणी मळा येथील विहीर, खडकवासला जॅकवेल, प्रयेजा सिटी या चार ठिकाणी क्लोरिनचे मशीन बसविण्यात आले आहे. त्यासाठी पुणे महापालिकेने ८७ लाख रुपये खर्च केला आहे.शहरात गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस)चे रुग्ण आढळलेल्या नांदेड, नांदोशी, किरकिटवाडी, धायरीच्या काही भागाला पुणे महापालिका विनाप्रकिया केलेले पिण्याचे पाणी देत आहे. नांदेड गावात जुनी विहीर आहे. या विहिरीत महापालिकेने धरणातून पाइपलाइनद्वारे येणारे पाणी सोडले आहे.या विहिरीतून नांदेड, नांदोशी, किरकटवाडी, धायरीच्या काही भागाला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या सर्व भागांना महापालिकेतर्फे विनाप्रक्रिया पाण्याचा पुरवठा केला जातो. या पाण्यामध्ये महापालिका केवळ ब्लिचिंग पावडर टाकत होती. त्यावर नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा मिळण्यासाठी नांदेड गाव, बारांगणी मळा येथील विहीर, खडकवासला जॅकवेल, प्रयेजा सिटी या चार ठिकाणी क्लोरिनचे मशीन बसविण्यात आले आहे. त्यासाठी महापालिकेने ८७ लाख रुपये खर्च केला आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.धायरी, नऱ्हे गावांना करणार शुद्ध पाणीपुरवठाधायरी, नऱ्हे गावांना पालिका विनाप्रक्रिया पाण्याचा पुरवठा करत आहे. त्यामुळे या गावांना शुुद्ध पाण्याच्या पुरवठा करण्यासाठी पालिका २०० मीटरची पाण्याची लाईन टाकणार आहे. त्यासाठी ७० लाख रुपये खर्च येणार आहे. या कामासाठी निविदा काढण्यात येणार आहे. साधारणपणे या कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
पालिकेने चार ठिकाणी बसविले क्लाेरिनचे मशीन; धायरी, नऱ्हे गावांना करणार शुद्ध पाणीपुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:06 IST