शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

Pune Ganpati Festival :भाविकांना देखावे पाहण्यासाठी स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट दर तीन मिनिटांला धावणार मेट्रो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 12:29 IST

- कसबा आणि मंडई मेट्रो स्थानकामुळे भाविकांना देखावे पाहण्यासाठी सुविधा

पुणे : गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी शहराच्या मध्य भागांत भाविकांची मोठी गर्दी होते. यामुळे भाविकांना ये-जा करण्यासाठी, तसेच गर्दीवर नियंत्रणासाठी महामेट्रोने गणेशोत्सवात स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट यादरम्यान दर तीन मिनिटांला मेट्रो सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी दोन दिवसांपासून चाचणी घेतली जात आहे. यामुळे मंडई, कसबा पेठ येथील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली.

पुण्यातील गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे. यामुळे देखावे पाहण्यासाठी राज्य, राज्याबाहेरील तसेच परदेशातील गणेशभक्त पुण्यात येतात. यंदा मध्य शहरातील कसबा आणि मंडई हे दोन मेट्रोस्थानक सुरू झाल्यामुळे भाविकांना मुख्य देखावे पाहण्यासाठी सोयीचे होणार आहे. गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत सेवा देण्याचे नियोजन केले आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मार्गावर मेट्रो सुरू असणार आहे. या मार्गावरील कसबा, मंडई, स्वारगेट ही मेट्रो स्थानके सुरू झाली आहे. ही स्थानके नागरिकांना थेट मानाच्या गणपतीच्या जवळपास आहे. शिवाय, मध्यवर्ती भागात गर्दी जास्त होते. त्यामुळे मेट्रोच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. तसेच, मध्य वस्तीमधील मंडई, कसबा येथे गर्दी होऊ नये म्हणून नियोजन करण्यात आले आहे. मंडई येथे एका बाजूला प्रवेश आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडण्याची सोय करण्याचे नियोजन आहे. कसबा स्टेशनला उतरा; मंडई स्टेशनपासून परतीचा प्रवास करागणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी व देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी कसबा मेट्रो स्टेशन येथे उतरावे. तेथून गणपती पाहण्यास जावे. परतीचा प्रवास मंडई मेट्रो स्टेशनपासून करावा. त्यामुळे एकाच मेट्रो स्टेशनवर गर्दी होणार नाही. तसेच, वनाझ ते रामवाडी मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्यांनी पीएमपी मेट्रो स्टेशन येथे उतरून देखावे पाहण्यासाठी शहरात जावे, असे आवाहन महामेट्रोकडून करण्यात आले आहे. 

पोलिसांसोबत बैठका सुरू

गर्दीवर नियोजनासाठी पोलिसांसोबत बैठका सुरू आहेत. आतापर्यंत तीन बैठका झाल्या असून, चर्चा झाल्यानंतर गर्दीचे नियोजन केले जाणार आहे. तसेच, इतरही मेट्रो स्टेशनवर गणपतीमध्ये गर्दी होण्याची शक्यता गृहित धरून योग्य नियोजन केले जात आहे. त्यासाठी मनुष्यबळदेखील वाढविण्यात येत आहे. 

गणेशोत्सवात मेट्रोची विशेष वेळापत्रक(दि. २७ ते २९ ऑगस्ट) - सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत(दि. ३० ऑगस्ट ते दि. ५ सप्टेंबर) - सकाळी ६ ते रात्री २ पर्यंत(अनंत चतुर्दशी दि. ०६ आणि ०७) - सकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी रात्री ११ पर्यंत

 गणेशोत्सवात भाविकांनी देखावे पाहण्यासाठी कसबा स्टेशनला उतरून पुढे जावे. तर परतीचा प्रवास मंडई स्टेशनवरून करावे. शिवाय मध्य भागात होणारी गर्दी लक्षात घेऊन स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट दरम्यान दर तीन मिनिटांनी मेट्रो सोडण्याचे नियोजन आहे. त्याची तयारी मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आली आहे. याचा भाविकांना दर्शन घेण्यासाठी सोयीचे होणार आहे.   - श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Ganpati Festivalपुणे गणेशोत्सव