पुणे कोर्टाने गुंड गजा मारणेसह त्याच्या २२ साथीदारांची केली निर्दोष मुक्तता  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 12:57 PM2021-02-10T12:57:54+5:302021-02-10T13:12:49+5:30

Pune Sesssions Court : गुन्हा सिद्ध न झाल्याने सुटका. पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

Pune gangster Gaja Marne and his aides acquitted by court in murder case | पुणे कोर्टाने गुंड गजा मारणेसह त्याच्या २२ साथीदारांची केली निर्दोष मुक्तता  

पुणे कोर्टाने गुंड गजा मारणेसह त्याच्या २२ साथीदारांची केली निर्दोष मुक्तता  

Next
ठळक मुद्देकोणत्याही साक्षीदारांनी या तपासाला दुजोरा दिलेला नाहीये. तसेच त्यांनी कोणालाही ओळखले नाही.या प्रकरणात जवळपास ३४ जणांची साक्ष तपासली गेली.

पुणे सेशन कोर्टाने गुंड गजा मारणे आणि त्याच्या बावीस साथीदारांचीा निर्दोष मुक्तता केली आहे. मारणे आणि् त्याच्या टोळीतल्या साथीदारांना घायवळ टोळीचा सदस्य अमोल बधे याला पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभुमीजवळ गोळ्या घातल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी गुन्हा सिद्ध न झाल्याने पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उठलं आहे. 

मारणे आणि घायवळ टोळीमधलं शत्रुत्व सर्वश्रुत आहे. त्यातुनच २००६ मध्ये मारणे टोळीच्या सदस्यांनी घायवळ टोळीवर हल्ला केला होता. त्याल्या प्रत्युतर म्हणुन घायवळ टोळीच्या सदस्यांनी मारणे टोळीतल्या अतुल कुडले आणि त्याचा भाउ सचीन कु़डले यांच्यावर दत्तवाडी मध्ये हल्ला केला होता. त्यामध्ये सचीन कुडले मारला गेला होता. त्याचंच उत्तर म्हणुन या हल्ल्यात सहभागी असलेल्या अमोल बढे वर मारणे टोळीतल्या सदस्यांनी हल्ला केल्याचा आरोप होता. मारणे आणि त्याच्या २२ साथीदारांविरोधात विश्रामबाग पोलिस स्टेशन मध्ये खुन, खुनाचा प्रयत्न, कट रचणे,मोक्का अशा कलमांअतर्गत गुन्हा दाखल केला होता. 


या प्रकरणात जवळपास ३४ जणांची साक्ष तपासली गेली. पण या प्रकरणातल्या सगळ्या साक्षीदारांनी त्यांची साक्ष फिरवली आणि कोणाचेच नाव यामध्ये घेतले नाही. तक्रारदार संतोष कांबळे याने त्याच्यावर हल्ला झाला आणि गोळी लागल्याचे सांगितले. पण त्यानेही कोणाचेही नाव यामध्ये घेतले नाही. कोणत्याही साक्षीदारांनी या तपासाला दुजोरा दिलेला नाहीये. तसेच त्यांनी कोणालाही ओळखले नाही. त्यांनी दिलेली साक्ष देखील मान्य नसल्याचे म्हणले आहे. त्यामुळे गुन्हा सिद्ध करणारा कोणताही थेट पुरावा नाहीये. तपास अधिकारी गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे या प्रकरणी सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचे कोर्टाने म्हणले आहे. 
 


 

Web Title: Pune gangster Gaja Marne and his aides acquitted by court in murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.