शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसायात भागीदारी करून नफा कमवून देतो,म्हणत केली १३ लाख रुपयांची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 20:28 IST

व्यावसायिकाला दोन भामट्यांनी १३ लाखांपेक्षा जास्त रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे.

लोणी काळभोर : व्यवसायात भागीदारी करून नफा कमवून देतो, असे आमिष दाखवून कदमवाकवस्ती येथील एका व्यावसायिकाला दोन भामट्यांनी १३ लाखांपेक्षा जास्त रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी श्रीपाद जयवंत बळप (वय ३९, रा.ओंकार निवास, शिक्षक कॉलनी, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता.हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोईन मुन्नई खान (सध्या रा.समतानगर, कदमवाकवस्ती ता.हवेली जि.पुणे, मुळ रा.घर नंबर ७९६/७ पुराणा रसुलपूर, फिरोजाबाद, उत्तर प्रदेश) आणि अब्दुल कलीम खान फैजुल्लाखान (सध्या रा.लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती ता.हवेली मूळ रा.जलाली मोहल्ला, मडगाव, जि.जळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत १४ जुलै २०२३ ते २० एप्रिल २०२५ या कालावधीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीपाद बळप आणि मोईन खान व अब्दुल कलीम खान हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत, तर आरोपी हे पोलपाट, चाळण, पिंजरे विक्रीचा होलसेल व्यवसाय करतात, तसेच बांगड्याही बनवितात. त्यांनी बळप यांना, या हस्तकला व्यवसायात खूप फायदा आहे, तुम्ही यामध्ये गुंतवणूक केली, तर तुम्हाला यामध्ये व्यवसायामध्ये भागीदारी देतो, असे सांगितले.

यावर बळप यांनी विश्वास ठेवून त्यांना चेक आणि आरटीजीएसद्वारे २० लाख ६३ हजार रुपये दिले. त्यानंतर, त्यांनी बळप यांना गुंतवणूक करण्यास सांगितले. ७ लाख ३३ हजार रुपये रक्कम परत दिली, परंतु उर्वरित १३ लाख ३० हजार रुपये दिले नाहीत. श्रीपाद बळप यांनी त्यांच्याकडे गुंतविलेल्या रकमेची मागणी केली असता, त्यांनी ती रक्कम देण्यास टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, बळप यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी