पुणे - पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील शिरोळे रस्त्यावर असलेल्या अण्णा हॉटेल येथे शुक्रवारी सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नसून परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं.घटनेची माहिती मिळताच पुणेअग्निशमन दल घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
Web Summary : A fire broke out at Anna Hotel in Shivajinagar, Pune. Firefighters quickly responded and are working to control the blaze. The cause is unknown, but no injuries have been reported. Traffic was temporarily halted on Shirole Road.
Web Summary : पुणे के शिवाजीनगर इलाके में अन्ना होटल में आग लग गई। दमकल कर्मी मौके पर पहुंचे और आग बुझाने की कोशिश कर रहे हैं। आग लगने का कारण अज्ञात है, लेकिन किसी के हताहत होने की खबर नहीं है। शिरोले रोड पर यातायात अस्थायी रूप से रोक दिया गया।