पुणे - पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर आज आगीची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. जंगली महाराज रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या खाजगी गॅरेजला अचानक आग लागली.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच वाहनांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आगीमुळे गॅरेजमधील साहित्य आणि वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून तपास सुरू आहे. आगीमुळे काही काळ जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
Web Summary : A fire broke out at a private garage on Jungli Maharaj Road in Pune, causing chaos. Five fire engines responded quickly and brought the blaze under control. While property damage is expected, no injuries have been reported. The cause is under investigation.
Web Summary : पुणे के जंगली महाराज रोड पर एक निजी गैरेज में आग लगने से अफरा-तफरी मच गई। दमकल की पांच गाड़ियां मौके पर पहुंचीं और आग पर काबू पाया। संपत्ति का नुकसान होने की आशंका है, लेकिन कोई घायल नहीं हुआ है। कारण की जांच जारी है।