शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Pune Fashion Street Fire : " सगळंच गेलंय...आता उभं कसं राहायचं माहिती नाही.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 17:31 IST

घरात दोन जण आजारी...थोडा धंदा होईल आणि त्यातून उपचाराला पैसा हाताशी येईल अशा अपेक्षेने ते या शनिवार रविवार ची वाट पाहत होते. पण तोच शनिवार त्यांची अपेक्षा धुळीला मिळवून गेला.

पुणे : ५५ वर्षांचे कय्युम कुरेशी सकाळपासून आपल्या जळून खाक झालेल्या दुकानात दर थोड्या वेळाने जात काही हाताशी लागतंय का बघतायेत. गेली १५ वर्ष ते इथल्या दुकानांत काम करत आहेत. कोरोनाच्या लॉकडाऊनमधून आत्ता कुठे त्यांचा धंदा सावरत होता. शनिवार रविवार चा सीझन आणि सणवार लक्षात घेता ज्यादा समान खरेदी करून ठेवलं होते. घरात दोन जण आजारी...थोडा धंदा होईल आणि त्यातून उपचाराला पैसा हाताशी येईल अशा अपेक्षेने ते या शनिवार रविवार ची वाट पाहत होते. पण तो शनिवार त्यांच्या उरलेल्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पण धुळीला मिळवून गेला. रात्री दुकानाला आग लागली आणि सगळंच होत्याचं नव्हतं झालं. 

कुरेशी म्हणाले " आमचं काहीच वाचलं नाही. नव्याने टी शर्ट आणले होते.आत्ता कुठे आम्ही सावरत होतो. कालच आम्ही लॉकडाऊन लागला तर काय याची भीती व्यक्त केली. होणाऱ्या नुकसानाची भीती खरी ठरली पण ती आगीमुळे. सगळंच गेलंय. आता उभं कसं राहायचं माहित नाही. " 

कुरेशींसारखीच अवस्था इथल्या जवळपास प्रत्येकाची आहे. दुकानातल्या मालाचे जळालेले तुकडेच आता इथे दुकान होतं याची साक्ष सांगताहेत. दुसरे एक व्यापारी म्हणाले "माझं बेल्टच दुकान आहे. त्याचे आता तुकडेच शिल्लक राहिले आहेत. ८ महिने आमचा कामधंदा बंद होता.आता रमजानमध्ये धंदा होईल म्हणून माल भरला होता. पण काल लागलेल्या आगीत सगळंच गेलं. सरकार ने आता या सगळ्या परिस्थितीकडे बघून काय चूक काय बरोबर या वादात न पडता सरळ आम्हाला पुन्हा इथे दुकानं चालू करायला मदत करायला हवी. अनेक घरं संसार यावर अवलंबून आहेत."

अनेकांच्या आशा आकांक्षांची कालच्या आगीत राखरांगोळी झाली आहे. पण त्याहून ही मोठा प्रश्न त्यांचा समोर आहे तो म्हणजे पुढे काय ?

टॅग्स :PuneपुणेfireआगFire Brigadeअग्निशमन दल