शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Pune: फोटो शूटला नकार; महिलेने दिली अत्याचाराची केस करण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 15:52 IST

आता लगेच फोटो शूट होणार नाही आपण नंतर करू असे म्हणताच महिलेने ४३ वर्षीय फोटोग्राफरला बलात्काराची केस करण्याची धमकी दिली.

पुणे : आता लगेच फोटो शूट होणार नाही आपण नंतर करू असे म्हणताच महिलेने ४३ वर्षीय फोटोग्राफरला बलात्काराची केस करण्याची धमकी दिली. याप्रकरणी स्वप्नील वसंत रास्ते (४३, बिबवेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनुराधा मुक्तेश्वर पाटील (रा. नऱ्हे, मुळ रा. सोलापूर) या महिलेविरोधात बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनुराधा ही ६ नोव्हेंबर रोजी स्वप्नील रास्ते यांच्या बिबवेवाडीतील फोटो स्टुडिओत गेली होती. तिला फोटो शूट करायचे होते. त्यावर रास्ते यांनी लगेच फोटो शूट होणार नाही, आपण नंतर करू असे सांगितले. यावर आरोपीने त्यांना तुझ्यावर बलात्काराची केस करेन अशी धमकी दिली. तसेच रास्ते यांच्याकडे पैशांची मागणी केली.फिर्यादींनी घाबरून तिला २० हजार रोख दिले. यानंतरही अनुराधा हिने पुन्हा पैशांची मागणी करण्यास सुरूवात केली. तसेच पैसे दिले नाही तर तुझ्या स्टुडिओत येऊन तुला मारले तर नावाची अनुराधा पाटील नाही अशी धमकी देत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सावंत या करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी