- अंबादास गवंडी
पुणे : दिल्ली येथे होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त पुणे आणि दिल्ली सफदरजंगदरम्यान सीआर एफटीआर विशेष रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे. संमेलनासाठी पुण्यातून जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही विशेष गाडी धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
पुणे-दिल्ली सफदरजंग (ट्रेन क्रमांक ००१७६) विशेष रेल्वे पुणे येथून बुधवारी (दि. १९) दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी सुटणार आहे. या गाडीला जळगाव आणि ग्वालियर जंक्शन असे दोनच थांबे दिले आहेत.
परतीच्या प्रवासात ही गाडी २३ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी दिल्ली सफदरजंग येथून सुटणार आहे. तर भोपाळ, मनमाड जंक्शन या दोनच थांब्यावर गाडी थांबणार आहे, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.