शहरं
Join us  
Trending Stories
1
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
2
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
3
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
4
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
5
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
6
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
7
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला राशीनुसार करा दान; मिळेल सौख्य, शांति, समाधान!
8
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
9
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
10
कली म्हणतात तो हाच; जो आता घराघरात शिरलाय, नव्हे तर मनामनात शिरलाय!
11
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
12
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?
13
वडिलांकडे फी भरण्यासाठी नव्हते पैसे, गरिबीत गेलं बालपण; आज आहे 485 कोटींची मालकीण
14
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
15
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
16
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल
17
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
18
सावधान! RTO ने नियम बदलले, १ जूनपासून लागू होणार नवे रुल्स;...तर भरावा लागेल २५ हजारांचा दंड
19
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
20
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत

डोंगर-दऱ्या अन् घाटातून, प्रचंड ऊन-थंडी आव्हाने पेलत पुण्याच्या सायकलपटूंनी पार केले १२२० किमी.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 12:01 PM

फ्रान्समध्ये जागतिक सायकल स्पर्धेत पुण्याचे १४ सायकल स्वारांचा डंका

पांडुरंग मरगजे 

धनकवडी : ऑडॅक्स क्लब पॅरिसियन आयोजित पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस २०२३ (पीबीपी) या जागतिक सायकल स्पर्धेत पुण्याच्या सायकलपटूंनी उत्तुंग यश मिळत फ्रान्समध्ये भारताचा डंका वाजवला आहे.

पॅरिसमध्ये झालेल्या रॅन्डोनिअर या स्वयंआधारित 1220 कि. मी. ब्रेव्हेट स्पर्धेत जगभरातून तब्बल आठ हजार तर भारत देशातून 280 सायकलपटू सहभागी झाले होते. यामध्ये पुण्याचे १४ सायकल स्वारांनी या स्पर्धेचे आव्हान स्वीकारले. ही 1220 किलोमीटरची सायकल स्पर्धा पूर्ण करण्यासाठी 90 तासांचा कालावधी दिला जातो. 

पुण्याचे अल्ट्रा सायकलपटू ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. ओंकार थोपटे यांनी ८९ तास २२ मिनिटांत ही स्पर्धा पूर्ण करुन इतिहास रचला. लंडन एडिनबर्ग लंडन ही स्पर्धा २०२२  मध्ये आणि पीबीपी ही स्पर्धा २०२३ या लागोपाठ वर्षी पूर्ण केलेले ते एकमेव भारतीय डॉक्टर असून ही स्पर्धा कमालीची अवघड असून सुद्धा त्यांनी ती पूर्ण केली. ह्या स्पर्धेत अवघे ९० तास १२२० किमी पार करण्यात दिलेले असतात आणि डोंगरदर्यातून, घाटातून, विषम हवामानात रात्री थंडी, तर दिवसा प्रचंड ऊन, भारतीय खाण्याची गैरसोय, आणि अपुरी झोप या गोष्टींचा सामना करत ही स्पर्धा पूर्ण करावी लागते. शेवटच्या दिवशी सायकलस्वारांना उलटे वारे आणि प्रचंड पाऊसाचा सामना करावा लागला.  ट्रायएथलीट गगन ग्रोव्हर यांनी ही स्पर्धा ८६ तास १० मिनिटांत तर पुणे राण्डोनर्सच्या महिला सायक्लिस्ट अंजली भालिंगे यांनी ८८ तासात ही स्पर्धा पूर्ण करुन पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. सूरज मुंढे, किरीट कोकजे, संतोष बिजुर, अक्षय जोशी दिनेश मराठे यांनी दिलेल्या वेळेबाहेर  ही स्पर्धा पूर्ण केली. या स्पर्धेत पुण्याच्या महिला सायकलिस्ट डॉ. लीना पाटणकर यांनी ११०० कि.मी. अंतर पूर्ण केले. प्रचंड झोप येत असल्यामुळे ही स्पर्धा थोड्या अंतरासाठी सोडावी लागली. आशिष जोशी यांनी ब्रेस्टपासून पॅरिस पर्यंतचे अर्धे अंतर पार करून पुढच्या चेक पॉईंटला पोहोचल्यानंतर गुडघ्याची सूज वाढली व वेदना सहन न झाल्याने ही स्पर्धा सोडावी लागली. 

चंद्रकांत बारबोले यांना मानेच्या प्रचंड दुखण्यामुळे ही स्पर्धा ८५० किमी अंतरावर सोडवी लागली. या अष्टपैलू सायकलपटूंनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले व भारताचा तिरंगा पॅरिसमध्ये अभिमानाने फडकवला. त्याबद्दल पुणे राण्डोनर्स च्या सदस्यांनी एकच जल्लोष केला. तसेच हा आनंद पुणे राण्डोनर्स च्या सदस्यांनी केक कापून व मिठाई वाटप करून साजरा केला.

टॅग्स :PuneपुणेDhankawadiधनकवडीFranceफ्रान्सCyclingसायकलिंगHealthआरोग्य