शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime : कबुतर चोरीच्या संशयातून तरुणाचा खून; अपघाताचा बनाव उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 10:28 IST

कबुतर चोरीच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना वानवडी परिसरात उघडकीस

पुणे : कबुतर चोरीच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना वानवडी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी चार सख्ख्या भावांना अटक करण्यात आली आहे. गौरव विजयकुमार माजी (वय २२), सचिन विजयकुमार माजी (वय २३), मोनू विजयकुमार माजी (वय २६), बंटी विजयकुमार माजी (वय. १८, सर्व रा. शंकर मठ, पावर सोसायटी वैदवाडी हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना बुधवारी (दि. १८) पहाटेच्या सुमारास घडली. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने या चौघा सख्ख्या भावांना अटक केली आहे. तर रुपेश धनराज शिंदे (वय १९, रा. मोशी, पिंपरी-चिंचवड) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील धनराज बळीराम शिंदे (वय ४५) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश शिंदे आणि त्याचा मित्र अजय टिंगरे हे दोघे पहाटे दुचाकीवरून मोशीकडे जात होते. हडपसर येथील शंकरमठ परिसरात ते थांबले असता जवळील मोकळ्या जागेत कबुतरांच्या पेट्यांजवळ गेले. त्यावेळी कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे स्थानिकांना संशय आला आणि काही जणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. भीतीपोटी दोघे पळू लागले, मात्र पळताना रुपेश घसरून पडला आणि तो आरोपींच्या ताब्यात सापडला.

यानंतर आरोपींनी त्याला लाकडी बॅट, लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्याला कबुतरांच्या ढाबळीला बांधून ठेवले. सकाळी त्याची प्रकृती बिघडल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपींनी अपघाताचा बनाव रचत त्याला रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

खंडणीविरोधी पथकाचे पोलिस हवालदार नितीन मुंढे यांना त्यांच्या बातमीदाराने ही माहिती दिली होती. पोलिसांनी रुग्णालयाच्या चाळीस क्रमांकाच्या वॉर्डात जाऊन चौकशी केली. तेव्हा दोघे संशयित त्यांना मिळून आले. तोपर्यंत रुग्णवाहिकेतून आणलेला तरुण मयत झाला होता. चौकशीत दोघांनी सांगितले आमची कबुतराची ढाबळ आहे. खून झालेला तरुण रुपेश हा कबुतरे चोरी करण्यासाठी आला असावा, असा संशय आम्हाला आला. त्यातूनच त्याला आम्ही पाच जणांनी बेदम मारहाण केली. रात्री त्याला ढाबळीला बांधून ठेवले. सकाळी पाहिले तेव्हा त्याला उलटी होत होती. तसेच तो शुद्धीत नव्हता. त्यामुळे आम्ही सुरुवातीला त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याला डॉक्टरांनी ससून रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. अपघाताचा बनाव रचण्याची आम्ही तयारी करत होते. ससूनमध्ये घेऊन येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. ही कामगिरी पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Pigeon theft suspicion leads to youth's murder; accident cover-up exposed.

Web Summary : Pune: A youth was fatally beaten over pigeon theft suspicion in Wanwadi. Four brothers are arrested. They fabricated an accident after realizing the victim's condition worsened, but he died before reaching the hospital. Police uncovered the crime.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रPune Crimeपुणे क्राईम बातम्या