शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: तरुणाकडून २ साथीदारांवर कठीण वस्तूने वार; एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 11:23 IST

गेल्या काही दिवसांपासून तिघे एकत्र राहत असताना त्यांच्यामध्ये काही कारणावरुन वाद झाला होता

पुणे : एकाच रुममध्ये राहणार्‍या तरुणाने आपल्या दोन साथीदारांवर डोक्यात कठीण वस्तूने घाव घातले. त्यात एकाचा मृत्यु झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.  ही घटना वारजे येथील न्यू अहिरे गावातील गणपती माथा बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.

रामपूजन महेंद्रर शर्मा (वय २२, रा. मुळगाव शंकरपूर, दरभंगा, बिहार) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर राम भरोस शर्मा (वय २१) हा जखमी झाला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेही मुळचे बिहारमधील राहणारे आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते तिघे एकत्र राहत होते. रामपूजन हा सुतारी काम करीत असत. त्यांच्यामध्ये काही कारणावरुन वाद झाला होता. त्यानंतर आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हरिकुमार शर्मा याने रामपूजन व रामभरोस यांच्या डोक्यात कठीण वस्तूने वार केले. त्यात रामपूजन याचा मृत्यु झाला. ही माहिती मिळताच वारजे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रामभरोस याला पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी आरोपींला ताब्यात घेतले आहे. रामभरोस याची फिर्याद घेण्यात येत असून पोलीस निरीक्षक अमृत मराठे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकBiharबिहार