शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नसरापूर येथे हिप्नॉटाईज करून महिलेचे अडीच लाखांचे सोने लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:45 IST

दर्शनानंतर मंदिराबाहेर पडताच एक अनोळखी व्यक्ती स्कूटरवर त्यांच्यासमोर आली. त्याने महिलेला हिप्नॉटाईज करत बोलण्यात गुंतवले आणि मंदिराच्या दानपेटीत ९०० रुपये टाकण्यास सांगितले.

नसरापूर : येथील स्वामी समर्थ नगर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या महिलेला बोलण्यात गुंतवून लुटारूंनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि हातातील अंगठी लुटून पलायन केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २४) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे नसरापूर परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल शिवाजी रेणुसे (वय ६५, रा. नसरापूर, ता. भोर) असे लुटलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. कमल रेणुसे यांचे नसरापूर येथील एस. टी. स्टँड परिसरात हॉटेल आहे. त्या सकाळी हॉटेलकडे जात असताना नेहमीप्रमाणे स्वामी समर्थ नगर मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या.दर्शनानंतर मंदिराबाहेर पडताच एक अनोळखी व्यक्ती स्कूटरवर त्यांच्यासमोर आली. त्याने महिलेला हिप्नॉटाईज करत बोलण्यात गुंतवले आणि मंदिराच्या दानपेटीत ९०० रुपये टाकण्यास सांगितले. त्यानंतर, ‘तुम्हाला हॉटेलकडे सोडतो’, असे सांगून त्या लुटारूने कमल रेणुसे यांना स्कूटरवर बसवले आणि बनेश्वर फाट्यावरील काळुबाई मंदिराजवळ नेले. तिथे त्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र अंदाजे किंमत २ लाख रुपये आणि हातातील अंगठी अंदाजे किंमत ४० हजार रुपये असे एकूण २ लाख ४० हजारांचे दागिने लुटले आणि तेथून पलायन केले.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, नसरापूर ग्रामपंचायतीने परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजद्वारे या घटनेचा तपास सुरू आहे. आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, राजगड पोलिस पुढील तपास करत आहेत. 

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी