लोणी काळभोर : पूर्व हवेलीतील आळंदी म्हातोबाची गावाच्या हद्दीत अफू या अंमली पदार्थाची लागवड करणाऱ्यावर महिला शेतकऱ्यावर लोणी काळभोर पोलीसांनी कारवाई करुन ४ किलो वजनाची अफूची ६६ झाडे जप्त केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आळंदी म्हातोबा येथील एका शेतात अफूची झाडे असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाली असता बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी जाऊन छापा टाकला असता त्याठिकाणी शेत जमीनीमध्ये अफु या अंमलीपदार्थाची विक्री करण्याचे उद्देशाने, पिक लागवड करण्यात आल्याचे दिसून आले यात ४० हजार रुपये किंमतीची ४ किलो वजनाची ६६ अफुची झाडे हस्तगत करण्यात आली असून जमीन मालक महिले विरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेला अटक करण्यात आली आहे.ही कामगीरी पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलिस हवालदार रामहरी वणवे, गणेश सातपुते, प्रदीप क्षीरसागर, शैलेश कुदळे, नानापुरे अक्षय कटके व महिला पोलिस वनिता यादव, वैशाली निकंबे, तेलंगे यांच्या पथकाने केली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत अशाप्रकारे आफु ची लागवड करणाऱ्या लोकांविरुध्द यापुर्वीदेखील २ वेळा गुन्हे दाखल करुन कारवाई करण्यात आलेली आहे. अशाप्रकारचे अवैध धंदे करणाऱ्या वर लोणी काळभोर पोलिस कायदेशीर कारवाई करुन अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यात येणार आहे. - राजेंद्र पन्हाळे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक लोणी काळभोर पोलिस स्टेशन)