शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशी महिलांना पुण्यात आणणारा “बाबू भैया” कोण ? बुधवार पेठेतील मोठं रॅकेट उघड

By किरण शिंदे | Updated: February 20, 2026 15:27 IST

- पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत कारवाई करत २२ महिलांना ताब्यात घेतले होते.

पुणे - पुण्यातील रेड लाइट एरिया अशी ओळख असलेला बुधवार पेठेचा परिसर सध्या पुणे पोलिसांच्या रडारवर आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करत मानवी तस्करीचं मोठं रॅकेट उघडकीस आणलं होतं. थेट बांगलादेशातून महिलांना पुण्यात आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचं उघडकीस आलं होतं. आणि या सर्वांचा मास्टरमाईंड 'बाबू भैया' उर्फ पापा शेख  हा इसम असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं.तीन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत कारवाई करत २२ महिलांना ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान त्यापैकी ११ महिला या बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले. या महिलांकडे बोगस आधार कार्ड आणि इतर बनावट कागदपत्रे आढळली. फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात तपास सुरू असताना बाबू भैया उर्फ पापा शेख याचं नाव समोर आलं. या बाबु भैयाचा संपर्क थेट बांगलादेश सीमेवरील दलालांशी असल्याचं समोर आलं. हा बाबू भैया बोगस आधार कार्ड तयार करून देणाऱ्या दलालांच्या माध्यमातून बांगलादेशी महिलांना कोलकाता मार्गे पुण्यात आणायचा. या महिलांना ब्युटी पार्लर किंवा शिलाईकामाचे आमिष दाखवून पुण्यात आणले जायचे. त्यानंतर जबरदस्तीने त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचा आरोप या बाबु भैयावर आहे.या प्रकरणात पापा शेखसह सुमित्रा कांबळे, राजेश कलीमनी, रणजीत पात्रा आणि रूपा शेख यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ही संपूर्ण टोळी संघटित पद्धतीने हे रॅकेट चालवत होती.कोण आहे पापा शेख?पापा शेख सुमारे २० वर्षांपूर्वी बुधवार पेठेतील एका हॉटेलमध्ये काम करायचा. काही वर्षात त्याने बुधवार पेठेत आपला जम बसवला. त्या भागातील अवैध धंद्यांची माहिती मिळवली आणि अवैध धंदे तो चालवू लागला.  मागील काही वर्षात त्यांनी अवैध धंद्यातून मोठी कमाई केली असल्याचीही माहिती समोर आली आहे. बाबू भैया उर्फ पापा शेख याच्या तीन बायका असल्याचे समोर आले आहे.. यातील एक पत्नी बांगलादेशी आहे. त्याच्या तिन्ही बायका बुधवार पेठ परिसरात असून येथे त्यांचे चांगले प्रस्थ आहे. बुधवार पेठेत येणाऱ्या महिलांना त्याच्या बायका धमकवायच्या मारहाण करायच्या आणि तिथून बाहेर पडू देत नव्हत्या.  गुन्हा दाखल झाल्यानंतर बाबुभैया पापा शेख फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Bangladeshi women trafficked; 'Babu Bhaiya' racket exposed in Budhwar Peth.

Web Summary : Pune police busted a human trafficking racket in Budhwar Peth, rescuing 22 women, 11 from Bangladesh. Mastermind 'Babu Bhaiya' lured women with false promises, forcing them into prostitution. He has direct links to brokers on the Bangladesh border.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या