शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

'तुझ्यामुळे आमचा ब्रेकअप झाला,तुझ्या आयुष्याची...';बंदूक दाखवून तरुणाला केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 17:19 IST

‘आम्ही तुझ्या घरचा पत्ता काढू शकतो’, असे म्हणत ‘विमाननगर पोलिस चौकीच्या बाहेर एक मुलगी उभी आहे. ती तुझ्याविरोधात खोटी तक्रार देईल व तुला अडचणीत आणेल,’ अशी धमकी देऊ लागला.

पुणे : तरुणीच्या कंपनीतील तरुणामुळे ब्रेकअप झाला, असा संशय घेऊन प्रेमभंग झाल्याने तरुणाला बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. तुझी वाट लावण्यासाठी एक तरुणी तुझ्याविरोधात तक्रार देण्यासाठी तयार ठेवल्याचे आरोपीने सांगितले.

याबाबत फुलेनगर येथे राहणाऱ्या एका २८ वर्षांच्या तरुणाने वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आदर्श चौधरी (२४, रा. लोणावळा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वाघोलीमधील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलच्या मोकळ्या मैदानामध्ये २१ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे विमाननगर येथील एका कंपनीमध्ये नोकरीला आहेत. त्यांच्या कंपनीमधील एका तरुणीबरोबर आदर्श चौधरी याचे प्रेमसंबंध होते. एप्रिल २०२५ मध्ये या तरुणीनेच फिर्यादी यांची आदर्श चौधरीबरोबर ओळख करून दिली होती. त्यानंतर ते आदर्श याच्याबरोबर कधी बोलले नाही की भेटले नव्हते. फिर्यादी हे कंपनीत असताना आदर्श हा कंपनीच्या खाली आला असल्याचे समजल्यावर फिर्यादी यांनी फोन केला.

सायंकाळी सात वाजता कंपनीतून सुटल्यावर ते कंपनीच्या दारात भेटले. थोडा वेळ गप्पा मारल्यावर आदर्शच्या दुचाकीवरून ते वाघोली येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलच्या मोकळ्या मैदानामध्ये गेले. तेथे गेल्यावर आदर्श बोलू लागला. ‘माझी वाट लागली, माझे व तिचे प्रेमसंबंध संपून गेले. त्याला तू कारण आहेस. तुझ्यामुळेच सर्व काही झाले. मी आता तुझ्या आयुष्याची वाट लावणार,’ असे म्हणून फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी, कंबरेच्या बेल्टने मारहाण केली. तेथेच पडलेले लाकूड उचलून त्याने पाठीत मारहाण केली.

त्यानंतर बंदूक दाखवत फिर्यादीला, ‘आम्ही तुझ्या घरचा पत्ता काढू शकतो’, असे म्हणत ‘विमाननगर पोलिस चौकीच्या बाहेर एक मुलगी उभी आहे. ती तुझ्याविरोधात खोटी तक्रार देईल व तुला अडचणीत आणेल,’ अशी धमकी देऊ लागला. त्यानंतर त्यांना तेथेच सोडून दुचाकीवरून तो निघून गेला. त्यानंतर फिर्यादी यांनी मित्राला बोलवून घेत ससून रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक केदार पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड