शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य पडले महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल

By किरण शिंदे | Updated: March 6, 2026 10:45 IST

वसंत मोरे यांना आपण अनुसूचित जातीचे असल्याची माहिती असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक व हेतूपूर्वक आपल्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले.

पुणे - पुण्यातील माजी नगरसेवक वसंत कृष्णाजी मोरे यांच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, विश्वनाथ तुकाराम लहाडे (वय ७२) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

२५ फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिकेत वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी फिर्यादी विश्वनाथ लहाडे यांचा उल्लेख करत काही वक्तव्ये केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार, वसंत मोरे यांना आपण अनुसूचित जातीचे असल्याची माहिती असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक व हेतूपूर्वक आपल्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले.

तक्रारीनुसार, वसंत मोरे यांनी “लहाडे इतका दारू पिला होता की त्याला बोलताही येत नव्हते, ओढ्यामध्ये उतरून गटारे साफ करत आहे” असे वक्तव्य केले. तसेच हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा आरोपही फिर्यादींनी केला आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे आपली सामाजिक बदनामी झाली असून, कुटुंबीयांवर मानसिक ताण आला आहे, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सध्या कुटुंबीय भीतीच्या आणि तणावाच्या वातावरणात असल्याचेही फिर्यादींनी पोलिसांना सांगितले आहे.

या तक्रारीची दखल घेत शिवाजीनगर पोलिसांनी वसंत मोरे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Vasant More Booked Under Atrocity Act for Viral Statement.

Web Summary : Ex-corporator Vasant More faces Atrocity Act charges for allegedly making derogatory remarks against Vishwanath Lahade, an individual from a scheduled caste, during a press conference. Lahade claims More's statements were intentionally offensive and went viral, causing social stigma and family distress.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या