पुणे - पुण्यातील गजबजलेल्या फर्ग्युसन कॉलेज रोड परिसरात दोन तरुणांच्या गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावरही त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.माहितीनुसार, FC रोड परिसरात काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. एकमेकांना धक्का लागल्याच्या कारणावरून सुरू झालेला हा वाद अचानक पेटला आणि काही क्षणांत दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. काही वेळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
Web Summary : A fight broke out between two groups of young men on Pune's FC Road following a minor dispute. The incident, captured on CCTV, caused a temporary disturbance before police intervened. Authorities are investigating the incident to identify those involved, raising security concerns on the popular street.
Web Summary : पुणे के एफसी रोड पर मामूली विवाद के बाद दो युवकों के गुटों में मारपीट हो गई। सीसीटीवी में कैद हुई इस घटना से इलाके में कुछ देर के लिए अफरा-तफरी मच गई, जिसके बाद पुलिस ने हस्तक्षेप किया। अधिकारी मामले की जांच कर रहे हैं, जिससे सड़क पर सुरक्षा को लेकर चिंता बढ़ गई है।