दौंड :पुणे–सोलापूर महामार्गावरील खडकी (ता. दौंड) येथे सोमवारी दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. कार आडवी लावून ४ ते ५ अज्ञात व्यक्तींनी एसटी बस चालकाला खाली खेचत बेदम मारहाण केली. या हल्ल्यात सोलापूर आगाराचे चालक अतुल भोसले गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्यावर जोरदार मार लागल्याची माहिती पोलिसांनी दिली.घटनेनंतर बसमधील प्रवाशांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून जखमी चालकाला दौंड येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला चालक बोलण्याच्या स्थितीत नसल्याने तक्रार नोंदवता आली नव्हती. मात्र मंगळवारी शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि त्यानंतर रावणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान, एका प्रवाशाने संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला होता. हा व्हिडिओ पुढे चालक व परिवहन अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याने प्रकरणाला वेग आला. सोलापूर आगार प्रमुखांनी तत्काळ दौंड येथे येत अधिकृत तक्रार दिली.प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कारच्या क्रमांकावरून संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून आरोपी दौंड तालुक्यातील मळद परिसरातील असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
Web Summary : In Khadki, Pune-Solapur highway, an ST bus driver was brutally attacked by 4-5 individuals. The driver sustained serious head injuries and is hospitalized. Police are investigating, suspecting the attackers are from the Malad area. ST union warns of protests if arrests aren't made.
Web Summary : पुणे-सोलापुर राजमार्ग पर खड़की में एसटी बस ड्राइवर पर 4-5 लोगों ने हमला किया। ड्राइवर को गंभीर चोटें आईं। पुलिस जांच कर रही है, संदिग्धों के मलद इलाके से होने का शक है। एसटी यूनियन ने गिरफ्तारी न होने पर विरोध प्रदर्शन की चेतावनी दी है।