पुणे : शहरात विवाहित महिलांच्या आत्महत्यांच्या घटना पुन्हा एकदा समोर येत असून लोणीकंद परिसरात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. सासरच्या लोकांकडून होत असलेल्या छळाला आणि पैशांच्या मागणीला कंटाळून एका विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.मृत तरुणीचे नाव वैष्णवी जामकर असे असून तिचे लग्न अवघ्या आठ महिन्यांपूर्वी झाले होते. लग्नानंतर काही काळ सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, काही दिवसांपासून सासरच्या लोकांकडून तिच्यावर पैशांसाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून वैष्णवीने घरातच ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणी मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी लोणीकंद पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू केला असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, पुण्यात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Web Summary : Vaishnavi Jamkar, a Pune newlywed, tragically committed suicide after alleged harassment from her husband and in-laws for dowry. Police have registered a case and are investigating the circumstances surrounding her death, raising concerns about women's safety.
Web Summary : पुणे में विवाहित वैष्णवी जामकर ने दहेज के लिए पति और ससुराल वालों द्वारा कथित उत्पीड़न के बाद आत्महत्या कर ली। पुलिस ने मामला दर्ज कर मौत के कारणों की जांच कर रही है, जिससे महिलाओं की सुरक्षा को लेकर चिंता बढ़ गई है।