शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांची चिमुकली भिकेसाठी अपहरण;तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 16:40 IST

- या कारवाईत पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांना अटक करून भिक मागण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफास केला आहे.

पुणे - भिक मागण्यासाठी कात्रज येथील वंडर सिटी झोपडपट्टीमधून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या चिमुकलीची भारती विद्यापीठ पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट ०२ च्या पथकाने तुळजापूर (धाराशिव) येथून सुखरूप सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांना अटक करून भिक मागण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफास केला आहे.

सुनिल सिताराम भोसले (५१ वर्षे, धंदा मजुरी, रा. मोतीझारा, तुळजापुर, जिल्हा धाराशीव, शंकर उजन्या पवार (५० वर्षे) शालुबाई प्रकाश काळे (४५ वर्षे), गणेश बाबु पवार (३५ वर्षे, तिघेही रा. डिकमाळ, पारधी वस्ती, तुळजापुर, धाराशीव), तसेच मंगल हरफुल काळे, (१९ वर्षे, रा. रेंज हिल, खडकी रेल्वे लाईनझोपडपट्टी, खडकी) असे पोलिसांनि अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंडर सिटी झोपडपट्टीमधून एका दोन वर्षाची चिमूकलीला २५ जुलै रोजी रात्रीच्या कोणी तरी झोपेतुन उचलून पळवुन नेले होते. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. चिमुकलीच्या शोधासाठी भारती विद्यापीठ पोलीसांची दोन टीम तयार केल्या होत्या. तसेच गुन्हे शाखेनेही तपास पथके तयार करुन कात्रज ते पुणे स्टेशन दरम्यानचे रोडवरील सर्व आस्थापनांचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले केले. त्यामध्ये दोन पुरुष व एक महीला हे एका दुचाकी गाडीवरुन पिडीत मुलीस घेवुन पुणे रेल्वे स्टेशनकडे जात असल्याचे गिसून आले. पोलीसांनी पुणे रेल्वे स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेरांची पाहणी केल्यानंतर त्याठिकाणी आरोपींसोबत आणखी दोन आरोपी असल्याचे दिसुन आले.

त्या ठिकाणावरुन आरोपींचे चेहरे स्पष्ट झाले. त्यानंतर सर्व आरोपी धाराशीव जिल्ह्यातील तुळजापुर या ठिकाणी असल्याची माहीती भारती विद्यापीठ व गुन्हे शाखा, युनिट २ च्या तपास पथकाला मिळाली.मिळालेल्या माहीतीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोकाशी, पोलीस अंमलदार तसेच गुन्हे शाखा युनिट ०२ चे साय्यक पोलीस निरीक्षक कवठेकर व पोलीस अंमलदार अशी दोन पथके तुळजापुरला पोहचले. धाराशिव एलसीबी पोलीसांच्या मदतीने कौशल्यपुर्ण पध्दतीने तपास करून आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर चिमुकली सुखरुप असून भिक मागण्यासाठी तिचे अपहरण केल्याचे सांगितले. या कारवाईय पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील चिमुकली सुखरुप सुटका केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी