शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

हॅलो इन्स्पेक्टर : घराच्या दरवाजावर कोरलेले 'सनी' नाव दिसले; पोलिसांना क्लू मिळाला अन्...

By नितीश गोवंडे | Updated: June 12, 2025 11:19 IST

मांजरी परिसरातील शेतातील विहिरीत आढळला चेहरा नसलेला मृतदेह; कोणताही पुरावा नसताना हडपसर पोलिसांनी उलगडले खुनाचे गूढ, सोशल मीडियावर तपासल्या प्रोफाइल

पुणे : मांजरी परिसरातील एका शेतातील विहिरीत चेहरा नसलेला मृतदेह सापडल्याची माहिती जून २०१६ मध्ये हडपसर पोलिसांना मिळाली. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक संदीप देशमाने हे त्यावेळी डीबी पथकाचे प्रमुख होते. त्यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. चेहऱ्यावर मांस नाही, केवळ हाडे, अंगात हिरव्या-पांढऱ्या रंगाचा चौकडी शर्ट आणि पॅट असलेला मृतदेह त्यांनी बघितला.पाण्यामुळे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. मृतदेहाच्या पँटच्या खिशात पीएमपी बसचा अर्धा पास त्यांना सापडला. त्यावर सनी रॉय एवढेच लिहिलेले होते. त्याव्यतिरिक्त कोणतीही खूण नव्हती. २५ ते ३० वयोगटातील हा मृतदेह होता. दिवस-रात्र १० दिवस तपास केल्यानंतर अखेर या खुनाचा उलगडा झाला.सोशल मीडियावर शोध सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी अथवा कोणताही तांत्रिक पुरावा नसल्याने पोलिसांना हा मृतदेह नेमका कुणाचा आहे, त्याच्या घरी याबाबत कल्पना आहे का? याचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली. ४ ते ५ दिवस सोशल मीडियावर सनी रॉय नावाची प्रोफाइल तपासल्या. पाचव्या दिवशी सनी रॉय नावाच्या एका व्यक्तीच्या प्रोफाइलवर मिळताजुळता शर्ट असलेला फोटो आढळला. हडपसर परिसरात राहणाऱ्या एकाचे प्रोफाइल पोलिसांना सापडले. त्या व्यक्तीला अखेर पोलिसांनी शोधून काढले.रूममधील चारही मुलाची केली कसून चौकशी पोलिसांनी रूममधील मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सनी हा पीओपीची कामे करत होता. सनी रॉय व त्याच्या एका मित्राचे काही दिवसांपूर्वी भांडण झाल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार त्या मित्राला पोलिसांना ताब्यात घेतले. तो सनीच्या रूममध्येच राहत होता. सुरुवातीचे दोघे व रूममधील दोघांना सनीने घर बांधण्यासाठी काही पैसे बँकेत ठेवल्याचे माहीत होते.७-८ दिवसांपूर्वी सनी गेला होता यूपीला मूळगावी त्या घरामध्ये पोलिसांनी प्रवेश केल्यावर आणखी एक व्यक्ती पोलिसांना आढळली. पोलिसांनी विचारपूस केली असता सनी हा ७-८ दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश येथील त्याच्च्या मूळगावी गेला असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी रूममधील सर्व सामानाची, बॅगची तपासणी केली असता त्यांना पीएमपीचा एक अर्धा पास सापडला. तो पास आणि मृत सनीच्या खिशात मिळालेला अर्धवट पाससोबत जुळला.काळेपडळ येथे घराच्या दरवाज्यावर 'सनी' नावपोलिसांनी सोशल मीडियावरून शोधलेल्या व्यक्तीला सनी रॉयबद्दल विचारणा केली असता, त्याने मध्यस्थीमार्फत एकदा सनीला भेटल्याचे सांगितले. ती दुसरी व्यक्ती पोलिसांना काळेपडळ येथील एका छोटेखानी घराजवळ घेऊन गेली. या घराच्या लाकडी दरवाजावर 'सनी' नाव कोरलेले दिसले आणि पोलिसांना अनोळखी मृतदेहाबाबत ओळख पटण्याचा आशेचा किरण दिसला.प्रदेश येथील त्याच्या मूळगावी गेला असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी रूममधील सर्व सामानाची, बॅगची तपासणी केली असता त्यांना पीएमपीचा एक अर्धा पास सापडला. तो पास आणि मृत सनीच्या खिशात मिळालेला अर्धवट पाससोबत जुळला.पैशांसाठी पार्टीला शेतात नेत साधला डाव चौघांनी सनीकडे असणारे पैसे हडपण्याची योजना आखली. त्यांनी एका पार्टीचे आयोजन केले. सनीला घेऊन ते मांजरी परिसरातील एका शेतात घेऊन गेले. तेथे त्यांनी पार्टी केली. त्यानंतर सनीकडे बँकेतील पैशांची मागणी केली. सनीने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याला चौघांनी मारहाण केली. या जबरी मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची कबुली आरोपींनी दिली. मारहाणीत सनीचा मृत्यू झाल्याने चौघांनी जवळच असलेल्या विहिरीत सनीचे हात-पाय बांधून त्याला विहिरीत टाकले. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. २-३ दिवसांनी मृतदेह पाण्यावर तरंगायला लागल्याने या खुनाचा उलगडा झाला. 

कोणताही पुरावा नसताना जिद्दीने तपास केला, सर्व कौशल्य पणाला लावले तर अशाप्रकारे अज्ञात मृतदेहाची ओळख पटवून खुनाचा उलगडा होऊ शकतो. वेगवेगळ्या तपास पद्धतींचा अवलंब केल्यास १०० टक्के कोणत्याही अनोखळी मृतहेहाची ओळख पटते, गुन्हा निष्पन्न होतो. - संदीप देशमाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोथरूड पोलिस ठाणे

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या