शिरूर (पुणे जि. ) -तालुक्यातील दहिवडी परिसरात पुन्हा एकदा संशयास्पद मृत्यूची घटना उघडकीस आल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. मांजरेवस्ती येथे मंगळवारी (दि. १७) सायंकाळी १२ वर्षीय मुलाचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह विहिरीजवळ आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.मृत मुलाचे नाव साईराज गणेश मांजरे (वय १२) असून तो तळेगाव ढमढेरे येथील शाळेत इयत्ता सहावीत शिक्षण घेत होता. सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास दादाभाऊ मांजरे यांच्या विहिरीजवळ हा मृतदेह आढळला. मृतदेहाची अवस्था संशयास्पद असल्याने नागरिकांनी या घटनेमागे ‘नरबळी’चा प्रकार असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह हलवू देणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सखोल तपासाचे आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन विभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिक्रापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिपरत्न गायकवाड यांच्यासह वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची सखोल पाहणी करून नमुने गोळा केले असून त्यांची प्रयोगशाळेत तपासणी होणार आहे. तपासासाठी श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली आहे.दीड वर्षांपूर्वीही याच ठिकाणी घडली होती अशीच घटनाविशेष म्हणजे, २१ जून २०२४ रोजी याच ठिकाणी ११ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. एकाच ठिकाणी, समान वयोगटातील मुलांचे मृत्यू झाल्याने हा केवळ योगायोग नसून यामागे काही अघोरी प्रकार असू शकतो, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
Web Summary : A 12-year-old boy was found dead near a well in Dahivadi, Pune. Suspicion of ritualistic killing has sparked fear. This follows a similar death of an 11-year-old at the same location a year prior, raising concerns among residents.
Web Summary : पुणे के दहिवडी में एक 12 वर्षीय लड़का कुएं के पास मृत पाया गया। नरबलि के संदेह से दहशत फैल गई। एक साल पहले उसी जगह पर 11 साल के लड़के की भी इसी तरह मौत हुई थी, जिससे निवासियों में चिंता बढ़ गई है।