शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सॉरी बोल, नाहीतर...; पुण्यातील फिटनेस ट्रेनरला कुख्यात लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 20:43 IST

बिष्णोई गँगमधून बोलत असल्याचा कॉल आला व तो व्हिडीओ तत्काळ काढून टाक म्हणत शिवीगाळ केली

पुणे : कुख्यात लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाने पुण्यातील फिटनेस ट्रेनरला ‘सॉरी बोल, नाहीतर तुला आणि तुझ्या कुटुंबाला गोळ्या घालून मारून टाकू,’अशी धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दिल्लीतील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.भास्कर शहा, नरेश चौधरी आणि करण (तिघेही रा. दिल्ली) अशी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत धानोरी परिसरात फिटनेस ट्रेनरने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम २९६, ३५१ (२), ३५२ व ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी सध्या धानोरी परिसरात राहण्यास असून, ते मुळचे हरियाणामधील आहेत.ते गेली सहा वर्षे बॉडी बिल्डिंग आणि फिटनेसचे ऑनलाइन ट्रेनिंग देतात. यासाठी त्यांच्या नावाने इन्स्टाग्राम, यू ट्यूब व फेसबुकवर अकाउट आहे. याच माध्यमातून त्यांची आरोपी भास्कर शहा याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर ६ जून २०२५ रोजी फिर्यादींना नरेश चौधरी नावाच्या आरोपीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यानंतर फिर्यादींनी त्यांची रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्याने भास्कर शहा आणि करण यांच्यासोबत दिल्लीत पेइंगगेस्ट म्हणून राहत असल्याचे सांगितले. तसेच, भास्कर शहा आणि करण हे दारू पिऊन त्रास देत असल्याचे व्हिडीओ फिर्यादीच्या इन्स्टाला व स्वतःच्या इन्स्टाला पोस्ट केले. दि. ८ जून रोजी नरेश आणि करण यांनी त्यांच्या इन्स्टावरील पोस्ट डिलीट केली. नंतर फिर्यादींना त्यांच्या इन्स्टाग्रामवरील पोस्ट डिलीट करण्यास सांगितले. परंतु, त्यांनी ती पोस्ट डिलीट केली नाही.

त्यानंतर भास्कर शहा, करण व नरेश हे वारंवार फोनद्वारे धमकी देत होते. त्यानंतर ९ जून रोजी व्हॉट्सअॅप नंबरवरून त्यांना बिष्णोई गँगमधून बोलत असल्याचा कॉल आला व तो व्हिडीओ तत्काळ काढून टाक म्हणत शिवीगाळ केली. दरम्यान, दि. २ जुलै रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने कॉल करून मी लॉरेन्स बिष्णोई गँगमधून काला शूटर बोलत आहे, असे म्हणत भास्कर शहाला 'सॉरी बोल, नाहीतर तुला आणि तुझ्या कुटुंबाला गोळ्या घालून मारून टाकू,' अशी धमकी दिली. अधिक तपास विश्रांतवाडी पोलिस करत आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी